वडापुरी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
इंदापूर: वडापुरी (ता. इंदापूर) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वडापुरी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामस्थ तसेच ग्रामसेवक व कर्मचारी यांनी केले .
यावेळी उपस्थित सर्वांना ग्रामपंचायतच्या वतीने पेढे वाटप करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक वडापुरी येथील नाम फलकास पुष्पहार घालून या ठिकाणी उपस्थित सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नामाचा जयघोष करत घोषणा देण्यात आल्या तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडापुरी येथे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी व शिक्षण समितीचे पदाधिकारी यांनी प्रतिमेचे पूजन करून राज्य गीताचे गायन जयंती साजरी करण्यात आली. तसेच श्रीनाथ मंदिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, सहकार महर्षी कारखान्याचे संचालक घाडगे व गावातील ग्रामस्थ यांच्या वतीने पूजन करून जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

