निमसाखर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती विविध कार्यक्रमानी उत्साहात साजरी .
मिरवणुकीत भगवा झेंडा, भगवे फेटे व टोप्या ठरल्या आकर्षक.
इंदापूर: दि.१९ छत्रपती शिवाजी महाराज की जय ! जय भवानी जय शिवाजी ! चा जय घोषात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निमसाखर भागामध्ये विविध कार्यक्रमानी साजरी झाली. यावेळी मोठ्या प्रमाणावर शिवभक्त सामील होत नेत्र दीपक अशी नाशिकच्या ढोल पथकाच्या दणदणाटात मिरवणूक काढण्यात आली.
रविवार दि.१९ रोजी निमसाखर (ता.इंदापुर ) येथील चौक लगत राजवाडा भागात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आली.सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची मान्यवरांच्या हस्ते पूजा करत पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा व येथील हायस्कूल व कॉलेजच्या विद्यार्थी व शिक्षक याचबरोबर मोठ्या प्रमाणावर शिवभक्त उपस्थित होते. ही मिरवणूक निमसाखर येथील बस स्थानक चौकापासून पवारगल्ली , जुनी चावडी, आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक चौकापासून पुढे, लोहार गल्ली छत्रपती चौक पुन्हा मुख्य चौकात जवळ येऊन मिरवणूक समाप्त झाली.
मिरवणुकीसाठी नाशिकच्या ढोल पथकाने लयबद्ध आणि शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणुकीला सुरुवात झाली. शिवभक्तांनी आवर्जून पायजमा शर्ट आणि भगवी टोपी फेटा विशेषतः ही वेशभूषा परिधान केली होती. शिवजयंतीसाठी भव्य अशी मूर्ती डोळ्याला पारणे फेडणारी ठरत होती. दरम्यान इतर शिवभक्त ढोल ताशांच्या गजरात बेधुंदपणे नृत्य करत असताना वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे यांनीही लयबद्ध वाद्यावर ठेका धरला .

