राधिका माध्यमिक विद्यालय मध्ये शिवजन्मोत्सव साजरी
इंदापूर: राधिका माध्यमिक विद्यालय मध्ये शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष व इंदापूर नगरपालिकेचे मा. उपनगराध्यक्ष अरविंद विष्णू वाघ यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करून शिवजन्मोत्सवाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी शिवगीतावरती नृत्य सादर केले व लेझीमच्या तालामध्ये आणि हालगीच्या ठेक्यांमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय दडस व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

