shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय

शिर्डी प्रतिनिधी (संजय महाजन) :
 शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसीं सह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास करणारा तसेच देव, धर्म, युगपुरुष यांच्याशी समर्पित, रोजगारनिर्मिती सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा निर्माण करणारा अर्थ संकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे असे मत भाजपा उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी व्यक्त केले.

             श्री. गोंदकर यांनी प्रसिद्धि स दिलेले पत्रकात म्हटले आहे कि देवेंद्र फडणवीस यांचा अर्थ संकल्प शेतकरी हा एक घटक डोळ्या समोर धरला तरी तो खूप व्यपाक आहे. फक्त शेतकर्यांच्या साठी म्हणून अनेक निर्णय घेतले.
- प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर घातली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना नुसार प्रतिशेतकरी, प्रतिवर्ष 6000 रुपये राज्य सरकार देणार, केंद्राचे 6000 असे 12,000 रुपये प्रतिवर्ष मिळणार आहे.

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आता केवळ 1 रुपयांत पीकविमा मिळणार असून आधीच्या योजनेत विमाहप्त्याच्या 2 टक्के रक्कम शेतकर्‍यांकडून, आता शेतकर्‍यांवर कोणताच भार नाही.  2017 च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरित पात्र शेतकर्‍यांना योजनेचे लाभ देणार, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभ या सरकारने दिले. 12.84 लाख पात्र शेतकर्‍यांच्या खात्यात 4683 कोटी रुपये थेट जमा झाले.
 राज्यातील शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीसाठी महाकृषिविकास अभियान राबविणार, पीक, फळपीक घटकाच्या उत्पादनापासून ते मूल्यवर्धनापर्यंत तालुका, जिल्हानिहाय शेतकरी गट, समूहांसाठी योजना, एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार करणार 5 वर्षांत 3000 कोटी रुपये उपलब्ध करून देणारआता मागेल त्याला शेततळे, फळबाग, ठिबक सिंचन, शेततळ्यांचे अस्तरीकरण तसेच मागेल त्याला शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्र, कॉटन श्रेडर या योजनेवर 1000 कोटी रुपये खर्च करणार

 गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना यापूर्वी विमा कंपन्यांकडून आता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना, ही योजना राज्य सरकार राबविणार, त्यामुळे शेतकर्‍यांचा पूर्ण त्रास वाचणार, अपघातग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबांना पूर्वीच्या 1 लाखाहून आता 2 लाख रुपयांपर्यंत लाभ मिळणार आहे.
नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणार असून 3 वर्षांत 25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणणार, 1000 जैवनिविष्ठा स्त्रोत केंद्र स्थापन करणार, डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची व्याप्तीवाढ 3 वर्षांत 1000 कोटी रुपये निधी
 आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त महाराष्ट्रात ‘श्रीअन्न अभियान’ 200 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद
 कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणार्‍या शेतकर्‍यांना सुविधा अंतर्गत शेतकर्‍यांच्या मुक्कामासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन व जेवणासाठी शिवभोजन थाळीची उपलब्धता
देशी गोवंशाचे संवर्धन, संगोपन, संरक्षणासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना करणार, आयोगामार्फत गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना, गोमय मूल्यवर्धन योजना राबविणार, देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी भ्रूण बाह्यफलन, प्रत्यारोपण सुविधेत वाढ होईल.
अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय होणार असून जिल्ह्यातील विध्यार्थ्यांना फायदा होईल.
दिवसा वीजपुरवठ्यासाठी 3 वर्षांत 30 टक्के कृषी वीजवाहिन्यांचे सौर उर्जीकरण, 9.50 लाख शेतकर्‍यांना लाभ प्रधानमंत्री कुसुम योजनेतून 1.50 लाख सौर कृषीपंप देणार असल्याने शेतकऱ्यांना फायदा होईन.

       नदीजोड प्रकल्प मुळे गोदावरी खोर्‍यातील तूट भरून काढण्यासाठी पाणी वापरणारी असल्याने मराठवाडा तथा उत्तर महाराष्ट्रातील नगर जिल्ह्याला लाभ मिळणार आहे.

सिंचनाचे विविध प्रकल्प पूर्ण करणार असल्याने गेल्या 8 महिन्यात निळंवंडे 27 सिंचन प्रकल्पांना सुप्रमा, चालू 268 पैकी 39 प्रकल्प यावर्षी पूर्ण करणार, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील 6 प्रकल्प यावर्षी पूर्ण करणार, बळीराजा जलसंजीवनी योजनेतील 24 प्रकल्प पूर्ण करणार, मराठवाडा वॉटरग्रीडचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेला देऊन नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा न्याय मिळणार आहे.

महाराष्ट्र मेंढी व शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करणार असून 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध होणार आहे. अहमदनगर येथे मुख्यालय असणारे राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेत मेंढीपालनासाठी भरीव निधी दिला आहे.
         निराधार योजना १००० रुपये वरुन १५०० रुपये
२० हजार ग्रामपंचायत मध्ये सौर ऊर्जा प्रकल्प स्थापन करणार



- अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय 
- राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचे मुख्यालय अहमदनगर 
- निळंवंडे धरण ला सुप्रिमा
close