शौकतभाई शेख
श्रीरामपूर- सुवर्णकार समाजातील व इतर विविध प्रलंबित प्रश्नांना आपण वाचा फोडून समाजाला न्याय मिळवून देऊन समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी केले.
श्रीरामपूर शहरातील सराफ बाजारात सराफ सुवर्णकार संघटनेच्यावतीने व सुवर्णकार महिला मंडळाच्यावतीने भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार करण्यात आला, या प्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक दिलीप नागरे होते. ज्येष्ठ नेते उमाकांत लोळगे, पत्रकार प्रकाश कुलथे, प्रकाश चित्ते,अनिरुद्ध महाले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी त्या म्हणाल्या सुवर्णकार समाज व सराफ हा घटक समाजात सोन्यासारख्या धातूंची शुद्धता तपासणारा आहे. तसेच सोनाराने कान टोचल्याशिवाय त्याचे हिंदुत्व सिद्ध होत नाही. अशा समाजात माझ्यासारख्या स्रीचा जन्म झाला याचा मला सार्थ अभिमान आहे.
श्रीरामपूर येथील सुवर्णकार समाजाने माझा जो सन्मान केला यासारखे दुसरा आनंद माझ्या जीवनात नाही. प्रकाश चित्तेंसारखा हिंदुत्ववादी कार्यकर्ता श्रीरामपुरात आहे आणि तो सोनार समाजाचा आहे ही खरोखरच संपूर्ण महाराष्ट्रातील सुवर्णकार समाजाला अभिमानाची गोष्ट आहे भविष्यकाळात त्यांना निश्चितच चांगले पद मिळेल यात शंका नाही त्यासाठी त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहून त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही वाघ यांनी याप्रसंगी दिली.
याप्रसंगी सराफ सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष स्वामीराज कुलथे यांनी प्रास्तविकात सुवर्णकार समाजातील विविध समस्या व अडीअडचणी विशद केल्या. तर चित्राताई वाघ यांचे निवडीबद्दल अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिरुद्ध महाले यांनी केले. व आभार मनोज नागरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष स्वामीराज कुलथे, मंगेश लोळगे, मनोज नागरे, वैभव मुंडलिक, महेश उदावांत, नितीन चित्ते यांनी परिश्रम घेतले.
यावेळी दीपाली चित्ते, स्नेहलता कुलथे, सुषमा महाले, सुरेखा महाले, जयश्री नागरे, उज्वला लाड, अनिता मुंडलिक, वैशाली चिंतामणी, संतोष उदावंत, रमाकांत लोळगे, राजेंद्र बोऱ्हाडे, प्रमोद लोळगे, सतिष नागरे, राजन माळवे, दादा जगदाळे, मनोज चिंतामणी, आमोद मुखेडकर, निलेश लोळगे, गणेश लोळगे, ज्ञानेश्वर नागरे, विकी मुंडलिक, प्रणव बोऱ्हाडे, श्रीपाद बोऱ्हाडे यांच्यासह सर्व समाज बांधव उपस्थित होते.
श्रीरामपूर येथील सराफ सुवर्णकार समाजाच्यावतीने भाजपाच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी चित्राताई वाघ यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना मा. नगरसेवक दिलीप नागरे, पत्रकार प्रकाश कुलथे, उमाकांत लोळगे, अध्यक्ष स्वामीराज कुलथे, अनिरुद्ध महाले, निलेश लोळगे, महेश उदावंत आदी.
छाया : संजय पगारे

