अहमदनगर:-
सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिटय़ुट अहमदनगरच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपली मते दिलखुलास पणे मांडली. त्यानंतर विद्यार्थी व शिक्षक यांनी माळीवाडा बस स्टँड जवळ जावून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
'छत्रपती शिवाजी महाराज की जय' 'जय भवानी, जय शिवाजी' या घोषणांनी सारा परिसर दुमदुमून टाकला. यावेळी काश शेख, प्रिया मेहेत्रे, प्राजक्ता मनसुके, सुप्रिया काळे आदी शिक्षिका उपस्थित होत्या. मागील वर्षी शिवजयंतीला मोफत रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षी मोफत हिमोग्लोबीन तपासणी शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती डॉ. हरीष लुंकड यांनी दिली.

