shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रंग खेळत असताना कोरड्या रंगाचा वापर करत पाण्याचा अपव्यय टाळा - दत्तात्रय भरणे.

रंग खेळत असताना कोरड्या रंगाचा वापर करत पाण्याचा अपव्यय टाळा - दत्तात्रय भरणे.

आमदार दत्तात्रय  भरणे यांनी रंगाची उधळण करीत  केली धुळवड साजरी.
इंदापूर: होलिका प्रदिपन नंतरचा दुसरा दिवस म्हणजे धुलिवंदन त्यास धुळवड असे असेही म्हणतात. राज्यभरात मोठ्या उत्साहात धुलीवंदन साजरी केली जाते.  आज माजी राज्यमंत्री आणि इंदापूर तालुक्याचे आमदार  दत्तात्रय  भरणे यांनी पुणे येथील तळजाई टेकडी येथे सहकाऱ्यांच्या सोबत कलर खेळण्याचा आनंद घेतला. यावेळी खडकवासला मतदार संघाचे आमदार  भीमराव  तपकिर उपस्थित होते. याप्रसंगी  दत्तात्रय  भरणे यांनी  रंग खेळत असताना कोरड्या रंगाचा वापर करा. पाण्याचा अपव्यय टाळा. नैसर्गिक रंगांनाच प्राधान्य द्या. असे आवाहन केले व आमदार दत्तात्रय  भरणे यांनी रंग खेळत  धुलवड साजरी केली.
close