shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एस‌टीच्या कंत्राटी वाहन चालकांना कायमस्वरूपी करा - -मा. आमदार तानाजीराव सावंत यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.. !!


प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. ६ / महाराष्ट्रातील एसटी महामंडळाच्या कंत्राटी चालकांना कायमस्वरूपी कामावर रुजू करून घेण्यासाठी मा. आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना लेखी निवेदन दिले आहे.

 महाराष्ट्रातील एसटी महामंडळामध्दे चालक म्हणून १५/१/२००२२ ते ३/९/२०२२ पर्यंत कंत्राटी चालक म्हणून आठ महिने संपाच्या काळात जीवाची पर्वा न करता अत्यंत तुटपुंज वेतनावर खर्चाने प्रवास करून अखथंडीत सेवा केली. संप काळात टेंडर प्रमाणे यांना एसटीच्या नियमानुसार प्रवासी वाहतूक सुरळीत करण्याकरता यांची नेमणूक केले व या सर्व वाहकांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्याला जनतेची सेवा करायची आहे ही भावना मनात घेऊन पहिला रोजगार सोडून एसटीमध्ये भरती प्रक्रिया पूर्ण केली.

एसटीच्या नियमानुसार एसटीमध्ये चालक म्हणून त्यांची नेमणूक झाली संप काळामध्ये संपातील कर्मचाऱ्यांनी त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या तरीही त्यांनी आपली एसटीची सेवा सुरळीत चालली पाहिजे या उद्देशाने त्यांनी काम केले यावेळी त्यांना एसटी वाहकाकडून सुद्धा त्रास देण्यात आला व प्रवाशांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण होईल असी जाणीवपूर्वक परिस्थिती निर्माण केली कारण संपकरांच्या मनात संप असाच पुढे चालू राहावा अशी भावना होती पण हे कामावर हजर झाल्याने त्यांचा संप मोडीत निघाला. परंतु आज सर्व कंत्राटी वाहकांवर उपासमारीचे वेळ आले आहे पहिले काम सोडून दिल्यामुळे आता एसटी महामंडळाचा आधार नाही त्यामुळे त्यांच्यासमोर त्यांच्या व त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. असे म्हणावे लागेल की त्यांच्यासमोर जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिला आहे.

एस टी महामंडळाने संप काळात कंत्राटी वाहकांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांची भाकरी भाजून घेतली पण या सर्व वाहकांच्या भाकरीची सोय कोण करणार? बऱ्याच वाहकांचे संसार रस्त्यावर आलेले आहेत तरी संपात काम केलेल्या सर्व कंत्राटी वाहकांना रा.प.म. च्या सेवेत रुजू करून घ्यावे व महाराष्ट्रातील सर्व कंत्राटी चालक म्हणून काम करणाऱ्यांवर तुम्ही उपासमारीची वेळ येऊ देणार नाही अशी आम्हाला जाणीवपूर्वक खात्री आहे तरी त्यांना न्याय द्यावा अशी विनंती आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
close