shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राजवर्धन पाटील यांच्या इंदापूर शहरातील आयुष्यमान भारत गोल्डन कार्डच्या शिबिरांना भेटी - लाभार्थ्यांशी साधला संवाद

राजवर्धन पाटील यांच्या इंदापूर शहरातील आयुष्यमान भारत गोल्डन कार्डच्या शिबिरांना भेटी 
       - लाभार्थ्यांशी साधला संवाद 

फोटो :- इंदापूर शहरात आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढणेसाठी ठिकठिकाणी आयोजित शिबिरांना राजवर्धन पाटील यांनी सोमवारी भेटी दिल्या.
इंदापूर : प्रतिनिधी दि.6/3/23
             प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड नोंदणीसाठी  आयोजित शिबिरांना इंदापूर तालुका भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे अध्यक्ष राजवर्धन पाटील यांनी सोमवारी (दि.6) भेटी दिल्या. यावेळी त्यांनी लाभार्थ्यांशी तसेच कार्यकर्त्यांची संवादही साधला.
         इंदापूर शहरामध्ये भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने दि. 5 व 6 मार्च रोजी 9 ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड धारकांना रु. 5 लाख पर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत मिळणार आहेत. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचे गोल्डन कार्ड काढून लाभ घ्यावा, असे आवाहन याप्रसंगी राजवर्धन पाटील यांनी केले.
               इंदापूर शहरामध्ये तुळजाभवानी मंदिर अंबिकानगर, सावतामाळी मंगल कार्यालय सावतामाळीनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिकभवन आंबेडकरनगर, शिवसेना भवन श्रीराम सोसायटी , दत्त मंदिर समोर अष्टेकर ज्वेलर्स शेजारी खडकपुरा , श्रीराम मंदिर रामवेसनाका , गणपती मंदिर सरस्वतीनगर , व्यंकटेश मंदिर व्यंकटेशनगर ,नामदेव मंदिर कासारपट्टा येथे गोल्डन कार्ड काढण्यासाठी नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरांसाठी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. या सर्वांना राजवर्धन पाटील यांनी भेटी प्रसंगी धन्यवाद दिले.
________________________________

close