shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित मार्गाचे पीठाधेश्वर प.पुज्य. गुरुमाऊली अण्णा साहेब मोरे यांच्या अभिष्टचिंतना निमित्त विविध कार्यक्रम संपन्न

सामोडे-  (श्री दिलीप घरटे, प्रतिनिधी )
   
         अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित मार्गाचे पीठाधेश्वर प.पुज्य.गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या अभिष्टचिंतना निमित्त सर्व अध्यात्म सेवा केंद्रांच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.त्यात श्री स्वामी समर्थ अध्यात्म व बाल संस्कार केंद्र पिंपळनेर व श्री स्वामी समर्थ अध्यात्म व बाल संस्कार केंद्र सामोडे यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

         दिनांक १२ मार्च रविवार रोजी श्री स्वामी समर्थ केंद्र पिंपळनेर येथे श्री स्वामी समर्थ केंद्र व परिसर स्वच्छता सेवेकऱ्यांनी करून "मल्हारी सप्तशती" चे सामुदायिक पाठ वाचन करण्यात आले. 
         दिनांक १३ मार्च सोमवार रोजी धुळे जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या निरालय महादेव मंदिर श्री क्षेत्र गांगेश्वर येथे सेवेकऱ्यांनी जाऊन या तिर्थक्षेत्री मंदिर व परिसर स्वच्छता करून सामुदायिक रूद्र सेवा केली. तेथे एकुण १०७ रूद्र पाठ वाचन झाले.

       दिनांक १४ मार्च मंगळवार रोजी पिंपळनेर जवळील श्री क्षेत्र एकविरा माता मंदिर येथे जाऊन मंदिर व परिसर स्वच्छता करून  "श्री दुर्गा सप्तशती " पाठाचे सामुदायिक वाचन करण्यात आले.
    त्याच बरोबर सामोडे येथील श्री क्षेत्र भवानी माता मंदिर स्वच्छता व परिसर स्वच्छता करून  "श्री दुर्गा सप्तशती"  सामुदायिक पाठ वाचन घेण्यात आले तिथे एकुण १०३ पाठांचे वाचन झाले.
       दिनांक १५ मार्च बुधवार रोजी साक्री तालुक्यातील पवित्र व प्रसिद्ध तिर्थक्षेत्र  श्री कन्हैयालाल महाराज मंदिर आमळी येथे उपस्थित राहून श्री कन्हैयालाल महाराज मंदिर ,इतर सोबतचे मंदिरे व परिसर स्वच्छता करून " संक्षिप्त भागवत" या ग्रंथाचे सामुदायिक पारायण करण्यात आले.तिथे  एकूण १७८ भागवत संक्षिप्त पारायण झालीत.
      दिनांक १६ मार्च वार गुरुवार रोजी श्री स्वामी समर्थ अध्यात्म व बाल संस्कार केंद्र पिंपळनेर येथे एकत्र जमून सेवेकऱ्यांनी गावातील सर्व ग्रामदेवता मंदिरांची स्वच्छता व परिसर स्वच्छता केली त्यानंतर "जनकल्याण योजना" संदर्भात पिंपळनेर केंद्रात जनकल्याण शिबिर आयोजीत करण्यात आले.
     दिनांक १७ मार्च शुक्रवार रोजी पिंपळनेर रामनगर येथील श्री सप्तशृंगी माता मंदिर स्वच्छता व परिसर स्वच्छता करून सेवेकऱ्यांनी                  " श्री दुर्गा सप्तशती " पाठाचे सामुदायिक वाचन केले. त्या सोबतच सामोडे येथील साने गुरूजी प्राथमिक शाळा दत्त नगर सामोडे, जिल्हा परिषद मुलांची शाळा सामोडे,म्हसदी जि.प.प्राथमिक शाळा येथील मुलांना फळे ,बिस्किटे व शैक्षणिक वस्तूंचे सेवेकऱ्यांकडून वाटप करण्यात आले.
      दिनांक १९ मार्च  रविवारी रोजी भव्य रक्तदान शिबिर व वस्त्र दान सोहळा श्री स्वामी समर्थ केंद्र पिंपळनेर येथे आयोजीत करण्यात आला आहे.सेवेकऱ्या सोबतच इतर रक्तदात्यांनी "रक्तदान" शिबीरात सहभाग घेऊन रक्त दान करावे असे सामोडे व पिंपळनेर श्री स्वामी समर्थ अध्यात्म केंद्रांच्या वतीने आवहान करण्यात आले आहे.
close