shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सरकारतर्फे जनसामान्यांना देणार घरपाेच वाळू : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

नगर: अहमदनगर जिल्ह्यात बेकायदेशीर वाळू उपशाला आळा बसावा, त्याचप्रमाणे वाळू माफियांचा बिमाेड व्हावा, यासाठी वाळूची लिलाव पद्धत बंद करण्यात आली आहे. आता सरकारतर्फे वाळू उपसा करून नागरिकांना अल्पदरात वाळू घरपाेच केली जाणार आहे, अशी घाेषणा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

साकळाई याेजनेच्या सर्वेक्षणाला मंजुरी दिल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांची निवड झाल्याबद्दल नगर तालुक्याच्या वतीने नागरी सत्काराचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यावेळी मंत्री विखे पाटील बाेलताना म्हणाले, ”सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू मानून जनहिताच्या योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यावर शासनाचा भर आहे.

जिल्ह्यातील अवैधरित्या गौणखनिजाची वाहतूक व उत्खनन थांबविण्यासाठी वाळू धोरण राबविण्यात येणार आहे. या धोरणामुळे सर्वसामान्यांना अत्यंत माफक दरामध्ये घरपोहोच वाळू उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. खासदार डाॅ. सुजय विखे पाटील, विक्रमसिंह पाचपुते आदी उपस्थित हाेते.

close