shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महिला दिनानिमित्त दहावीच्या मुलींना मोफत लेखन साहित्य वाटप ; विश्वगुरूचा कौतुकास्पद उपक्रम


           
प्रतिनिधी : आसावरी वायकर
   
अक्कलकोट : ८ /  आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून अँग्लो उर्दू प्रशालेच्या दहावीच्या सत्तर मुलींना परीक्षेपूर्वी लेखन साहित्याचे वाटप करण्यात आले.

 विश्वगुरू महात्मा बसवेश्वर साहित्य परिषद, महाराष्ट्र यांच्या वतीने उर्दू माध्यमाच्या मुलींना लेखन साहित्य वाटप करून महिला दिवस साजरा करण्यात आला.निर्मला राजे कन्या प्रशालेच्या परीक्षा केंद्रावर केंद्रप्रमुख शरद जंगाले यांच्या हस्ते या लेखन साहित्याचे वाटप करण्यात आले.विश्वगुरूचे संस्थापक स्वामीनाथ हरवाळकर यांच्या पुढाकाराने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण रुग्णालयातील सर्व महिला डॉक्टर आणि महिला सेविकांचा लेखन साहित्य देऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागेश कोनापुरे,सुधीर माळशेट्टी, शरणू अल्लोळी, शिवलिंग कलबुर्गी यांनी परिश्रम घेतले.
close