shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

'करे योग रहे निरोगचा' संदेश देणार्‍या महिलांचा पतंजलिच्या वतीने सन्मान*

*'करे योग रहे निरोगचा'  संदेश देणार्‍या महिलांचा पतंजलिच्या वतीने सन्मान*
इंदापूर: इंदापूर नगरपालिकेजवळील जि. प.शाळा नंबर १ व २ येथे सुरू असलेल्या पतंजली योग समितीच्या स्थायी योग वर्गामध्ये   नियमितपणे योगासने आणि प्राणायाम सूर्यनमस्कार करून स्वतःचे आरोग्य निरोगी आणि सदृढ करुन समाजाला आरोग्याप्रती जागरुकतेचा करे योग रहे निरोगचा संदेश देणार्‍या महिलांचा महिला योग समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला.
    कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित सर्व महिलांच्या हस्ते दीप प्रज्वलानाने करण्यात आली. पतंजलीचा मानाचा वस्त्र पट्टा आणि गुलाब पुष्प देऊन सर्व महिलांचा सन्मान  करण्यात आला. महिला योग समितीच्या सायराभाभी आतार, मेघाताई भंडारी, जयश्रीताई खबाले, रेखाताई भंडारी,वर्षाताई ननवरे यांनी  आजच्या योग वर्गाचे संचलन करीत योग वर्गास मार्गदर्शन केले 
यावेळी  महिला साक्षरता आणि निरोगी निरामय आरोग्याचा संदेश देणाऱ्या ओव्याचे  महिलांनी गायन केले.
 आजच्या या महिला दिनाविषयी माजी प्राचार्य भीमराव वणवे, इंदापूर पतंजली योग समितीचे अध्यक्ष मल्हारी घाडगे, योगशिक्षिका मनीषा परबत  यांनी आपले मनोगत व्यक्त केले.महिला दिनाच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायराभाभी आतार यांनी केले तर आभार प्रदर्शन जयश्रीताई खबाले यांनी केले.
close