shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री गिरधरदास देवी विद्यालयात महिला दिन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा


प्रतिनिधी :  सुर्यकांत होनप

करमाळा: दि. ९ / करमाळा शहरातील विद्यालयात महिला दिन आगळ्या वेगळ्या पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रशालेतील मुलींना करमाळा तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन च्या वतीने स्त्री आरोग्य विषयी मार्गदर्शन करण्यात आले तसेच भविष्यात निर्भीडपणे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आयुष्यात भरपूर यश संपादन करणे या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आई आपल्या मुलांसाठी मुलांना घडवण्यासाठी खूप कष्ट घेत असते त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांकडून त्यांच्या आईला पुष्प गुच्छ देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

इतिहासाची पाने चाळली तरी काही महिलांची नावे इतिहासकारानाही टाळता आली नाहीत. जसे प्रत्येकाच्या हदयात आज ही जिवंत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणाऱ्या त्यांना घडविणाऱ्या जिजाउसाहेब, स्वतः च्या तानुल्या साठी प्रसंगी स्वतचा जीव धोक्यात घालून कडा उतरणारी हिरकणी, इंग्रजांविरुध लढणारी राणी लक्ष्मीबाई, शिक्षण व स्रीचा कसलाही संबध नसणाऱ्या काळात इंग्लंडमधे वैद्यकिय शिक्षण पुर्ण करणाऱ्या आनंदीबाई, दगड धोंडे सहन करून मुलीसाठी शिक्षणाची दारे  उघडणाऱ्या सावित्रीबाई, स्वतः आई नसतानाही अनेकाना प्रेम माया ममता देऊन अनाथांची आई बनलेल्या सिंधूताई, अशा प्रत्येक क्षेत्रात स्वतःला सिद्ध करण्याची महिलांची ही परंपरा आजही विज्ञानयुगात तशीच चालू आहे.

यावेळी उपस्थित शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रात स्वताचे वेगळे वलय निर्माण करणाऱ्या सौ‌. सुनिता भाभी देवी तसेच रुग्णसेवा हीच इशसेवा हे व्रत घेवून कार्य करणाऱ्या करमाळा तालुका मेडिकल प्रॅक्टीशनर्स असोशियन च्या सदस्या डॉ. शिवानी पाटील, डॉ. मेघना निंबाळकर, डॉ. निशा सारंगकर, डॉ. अपर्णा भोसले, सरकारी सेवा कौटुंबिक जबाबदारी सांभाळवाऱ्या सौ. माधुरीताई पवार, पतीचे छत हरपल्या नंतरही मोठ्या हिमतीने जबाबदारी पारपाडणाऱ्या श्रीमती कंगले, श्रीमती जोतीताई काळे, स्वच्छतेचे काम करणाऱ्या श्रीमती मुन्नी भाभी व विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना प्रेमाने भात खाऊ घालणाऱ्या सुरवसे मावशी या सर्वाचा शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देवून त्यांचा कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

या कार्यक्रमाचे प्रास्तविक श्री . सुहास गलांडे सर यांनी केले तर सुत्रसंचालन श्री. जे. डी. नरतवडेकर सर यांनी केले व आभार प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एस.एम जगताप सर यांनी मानले. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक वर्ग मोठ्या संख्येने हजर होता.
close