shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मुस्लिम मावळा ग्रुप निमसाखर शेखवस्ती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी.

मुस्लिम मावळा ग्रुप निमसाखर शेखवस्ती  छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी.
इंदापूर: मुस्लिम मावळा ग्रुप निमसाखर शेखवस्ती या ठिकाणी दि. १ मार्च २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.
 यावेळी मोफत नेत्र तपासणी शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. मोफत नेत्र तपासणी शिबिरामध्ये ७० लाभार्थ्यांनी  लाभ घेतला तसेच रक्तदान ५१ बाटल्या रक्त संकलित करण्यात आल्या. तसेच  मुस्लिम बांधवांनी  शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन एक आदर्शवत जयंती उत्सव साजरा  केला. 
दिवसभर विविध उपक्रमाने शिवजयंती साजरी करण्यात आली तसेच सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते महाराजांना अभिवादन करण्यात आले. 

यावेळी अभिजीत रणवरे पाटील, लालासाहेब पवार, राजवर्धन पाटील,दीपक  काटे,शेखर पानसरे, संजय जाधव, बबलू पवार, विकास कदम, अविनाश नलवडे, अमर काळे  यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
 मुस्लिम मावळा ग्रुप निमसाखर शेखवस्ती कार्यक्रमाचे आयोजक वसीम शेख व करण तनपुरे यांनी शिवजयंतीचे आयोजन केले होते. यावेळी वसीम शेख यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले व करण तनपुरे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.
close