युथ कराटे फेडरेशनच्या वतीने राष्ट्रीय खेळाडू सन्मान सोहळा व आदर्श पालक पुरस्कार वितरण समारंभ संपन्न !
प्रतिनिधी : संजय वायकर
नगर : ६ / अहमदनगर मधील खेळाडूंनी गोवा येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तसेच मागील वर्षांमध्ये राज्यस्तरीय आणि शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा दि. ४ मार्च २०२३ रोजी आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. तसेच सर्व खेळाडूंच्या पालकांना आदर्श पालक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी अरफा शेख , महेक पठाण , माही शेख , याहया सय्यद , आरफ शेख , अशाज शेख , अब्दुल रेहमान सय्यद , अब्दुल्ला सय्यद , तासिन सय्यद आरफ शेख , सुजित हजारे , अजीम सय्यद , साहिल सय्यद इत्यादी विद्यार्थ्यांना आदर्श खेळाडू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तर शालेय क्रीडा स्पर्धा आणि राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आलिया सय्यद , इब्राहिम शेख , अहमद शेख , अयमन शेख , शादाब शेख , जय्यान शेख , तुबाफातेमा पठाण , अरसलान सय्यद , हुझेफ शेख , आराध्या करांडे, या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
आदर्श पालक पुरस्काराने , प्राध्यापक मुदस्सर सय्यद , मतीनखान पठाण , तौसिफ शेख , तौफिक सय्यद , नियाजअहमद शेख , अर्शद शेख , सईद शेख , अहमदअली सय्यद, आदिल सय्यद , शाकीर सय्यद , या पालकांना आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी आ. संग्राम जगताप , प्रहार जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी , माजी. आरटीओ अधिकारी शाहनिजाम सय्यद , शिहान विजय कोळी , नगरसेवक असिफ सुलतान , नगरसेवक समद खान , नगरसेवक फारुक शेख , माजी नगसेवक शेख मुदस्सर, सामाजिक कार्यकर्ते जुबेर सय्यद , ज्येष्ठ पत्रकार अफजल सय्यद , जहीर सय्यद , आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन युथ कराटे फेडरेशन च्या वतीने करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक, युथ कराटे फेडरेशनचे अध्यक्ष साहिल सय्यद , सचिव सबिल सय्यद , प्रशिक्षक सुजित हजारे , प्रशिक्षक अजीम सय्यद यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्व खेळाडू विद्यार्थ्यांना आमदार संग्राम जगताप यांनी भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि प्रशिक्षकांचे अभिनंदन व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अन्वर सय्यद यांनी केले.

