प्रतिनिधी : सूर्यकांत होनप
करमाळा : ६ / दि .१७ फेबुवारी २०२३ रोजी करमाळा पोलीस ठाणे गु .र .नं ८८३ / २०२२ भादंवि कलम ३७९ प्रमाणे दाखल गुन्हयाचा तपास चालू असताना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि मोटारसायकल चोरी करणारे करमाळा शहरात आठवडा बाजारात फिरत आहेत. त्यावेळी आठवडा बाजारात जावून संशयितरित्या फिरत असणारे इसमांना त्यांचेकडील मोटारसायकलसह ताब्यात घेवून त्यांना अधिक विश्वासात घेवून त्यांची नांवे १) नितीन काळुराम माळी २४ रा चांडगांव ता श्रीगोंदा २) विजय गोरख गायकवाड १९ रा मुरकुटवाडी ता कर्जत अशी असून त्यांचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने सखोल तपास केला असता त्यांनी करमाळा, सांगोला, कर्जत, फलटण, अहमदनगर, सिन्नर नाशिक, पुणे वगैरे ठिकाणी मोटारसायकल चोरी केल्याबाबतची कबुली दिली.
त्यांचेकडे करमाळा पोलीस ठाणेकडील ३ कर्जत १ सांगोला १ फलटण १ अहमदनगर २ चिखली पुणे १ सिन्नर १वारामती १ एवढे उघडकीस आलेले असून आणखीन उघडकीस येणार आहेत. सदर आरोपी हे उस तोडी कामगार असून ते गावात पाळत ठेवून रात्रीचे वेळी मोटारसायकल हॅन्डल लॉक तोडून मोटारसायकल चोरी करीत असत. आरोपीकडून एकुण ४,९०,०००/- रू च्या १२ मोटारसायकली चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री शिरीष सरदेशपांडे सोो, अप्पर पोलीस अधिक्षक श्री हिंमत जाधव साो, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री डॉ. विशाल हिरे सोो यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जोतीराम गुजवटे सो पोहे कॉ अजित उबाळे, पोना चंद्रकांत ढवळे, पोकों गणेश शिंदे पोकों तौफीक काझी, पोकों सोमनाथ जगताप, पोकॉ अमोल जगताप
यांनी कारवाई केलेली आहे.

