फोटो: युवा नेते विक्रमसिंह मोरे यांना केक भरवून शुभेच्छा देताना राजवर्धन पाटील व इतर मान्यवर.
इंदापूर: इंदापूर तालुका युवा मोर्चा कोअर कमिटी प्रमुख व निरा भिमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांच्या हस्ते वालचंदनगर येथील विक्रमसिंह मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या वालचंदनगर प्रीमियर लीग २०२३ चा मानकरी ठरलेल्या अँडी 11 संघास बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी राजवर्धन पाटील यांनी विक्रमसिंह मोरे यांना केक भरहून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी इंदापूर तालुक्याचे माजी सभापती करणसिंह घोलप, ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मधुकर डोंबाळे पाटील, वालचंदनगर सहकारी बँकेचे चेअरमन राजेंद्र रणमोडे, युवा नेते मनोज जगदाळे, वालचंदनगर इंडस्ट्रीज अप्पा मानकरी , वालचंदनगरचे उपसरपंच संजय नकाते , वालचंदनगर सहकारी बँकेच्या संचालक संतोष गायकवाड, इंदापूर अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन सत्यशिल पाटील, मरमेड कन्सल्टिंग चे सीईओ सुरज इंदलकर, युवा उद्योजक अमोल शेठ बोंद्रे,पुणे जिल्हा शिक्षक आघाडीचे अध्यक्ष संतोष कदम सर, युवा उद्योजक योगेश जी चव्हाण, विकास घोगरे, इलाही सय्यद, ज्येष्ठ व्यापारी आप्पासाहेब कंदले उपस्थित होते.
फोटो: विजेत्या संघास पारितोषिक वितरण करताना
ह्या वेळी सर्वांनी विक्रम सिंह मोरे व संजय माने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राजवर्धन पाटील यांनी या स्पर्धेचे कौतुक करून सध्या मुलांना ग्राउंड वरती आणणे हेच मोठे आव्हान आहे व या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांनी खेळाचा आनंद घेतला याबद्दल सर्वांना शुभेच्छा दिल्या. ह्या वेळी पंचशील मैदानावर ते खेळलेल्या माजी खेळाडूंचा देखील सत्कार करण्यात आला.
अँडी 11 ह्या संघाला प्रथम पारितोषिक म्हणून दहा हजार एक रुपये व मानाचा चषक देण्यात आला. द्वितीय पारितोषिक सागर पाटील 11 या संघाला पाच हजार एक रुपये व मानाचा चषक देण्यात आला. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वालचंदनगर क्रिकेट क्लब वालचंदनगर या सर्व संयोजकांचे व अमोल शेठ बोंद्रे , संजय माने यांचे श्री विक्रम सिंह मोरे यांनी आभार मानले.
चौकट: वालचंदनगर प्रीमियर लीगचे उद्घाटन समारंभ उत्साहात
दि. ५ मार्च रोजी नीरा भीमा कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार ,ग्रामीण विकास प्रतिष्ठान चे अध्यक्ष रामचंद्र कदम,उपाध्यक्ष मधुकर डोंबाळे पाटील ,भाजप सहकार आघाडीचेचे रणजीत पाटील, कर्मयोगी कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गायकवाड, वालचंदनगरचे सरपंच कुमार गायकवाड, इंदापूर अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन सत्यशिल पाटील, वालचंदनगरचे उपसरपंच संजय नकाते, वालचंदनगर सहकारी बँकेचे संचालक संतोष गायकवाड, वालचंदनगर इंडस्ट्रीजचे अप्पा मानकरी , ज्येष्ठ व्यापारी आप्पासाहेब कंदले , रंनगावचे युवा नेतृत्व किशोर हगवणे, ज्येष्ठ मार्गदर्शक राजेंद्र हगवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वालचंदनगर प्रीमियर लीग चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अमरसिंह निंबाळकर, युवा उद्योजक जय फरतडे, दत्तात्रय शिंदे, अनिकेत सूर्यवंशी, विजय गोसावी, पोपट शिंदे, विजय खाडे, भारत चिल्ड्रन्स अकॅडमीच्या प्राचार्य शिरसागर सर, गोडसे सर, रनगावचे ग्रामपंचायत सदस्य संदीप गोसावी, विशाल गोसावी, सचिन गोसावी, राजेंद्र हगवणे, बबलू रणमोडे, संदीप मचाले अशा अनेक मान्यवरांनी भेट देवून विक्रम सिंह मोरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. यानंतर विक्रमसिंह मोरे व संजय माने यांचा वाढदिवसानिमित्त केक कापून सामन्यास सुरुवात करण्यात आली.

