shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडापुरी येथे श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा उत्साहात संपन्न.

वडापुरी येथे श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा उत्साहात संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: वडापुरी (ता. इंदापूर, जि. पुणे) येथे दिनांक २६ व २७ मार्च या दोन दिवसा ंच्या कालावधीमध्ये श्रीराम मंदिर मध्ये श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमातून संपन्न झाला.
 श्री नाथांची पुण्य पावन भूमी असणाऱ्या वडापुरी गावात  श्री राम मंदिर काही दिवसापासून बांधून पूर्ण झाले होते. त्या मंदिरामध्ये श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा श्रीराम भक्तांच्या वतीने अतिशय भक्तिमय वातावरणात दोन दिवसीय विविध धार्मिक कार्यक्रमातून  संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी गावातील अनेक दानशूर ग्रामस्थांच्या वतीने विशेष सहकार्य झाल्याची दिसून आले.

यामध्ये दिनांक २६ मार्च रोजी सकाळी ९ ते११ श्रीराम, सीता, लक्ष्मण व हनुमान यांच्या मूर्तीचे ग्राम प्रदक्षिणा रथातून वाजत गाजत फटाक्यांच्या आताश बाजी मध्ये ग्रामस्थांच्या सहभागातून करण्यात आली. यानंतर११त४ मूर्ती संस्कार विधी पुरोहित संतोष मुदगल यांच्या माध्यमातून करण्यात आले. यानंतर४ते ६ नैवेद्य व आरती  विवाहित दापत्याच्या हस्ते करण्यात आली.६ ते७ हरिपाठ करण्यात आला.८ते १० ह भ प शिवाजी महाराज शेळके यांचे भारुड चा कार्यक्रम संपन्न झाला.  दिनांक २७ रोजी पहाटे ४ ते दुपारी १२ वाजेपर्यंत पाच विवाहित जोडप्यांच्या हस्ते प्रत्यक्ष मूर्ती प्राणप्रतिष्ठा विधी संपन्न झाला. यावेळी  माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते श्रीरामनगर नाम फलकाचे अनावरण करण्यात आले. यानंतर त्यांच्या हस्ते व पाच विवाहित जोडप्यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली. आरती नंतर हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित भाविक ग्रामस्थ यांना श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या व   सर्व ग्रामस्थांच्या बरोबर या शिखर कामासाठी  सहकार्य करण्याचे यावेळी आश्वासन दिले तसेच यापूर्वीही राम मंदिर सभा मंडप  त्यांच्या माध्यमातून  देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अशाच पद्धतीने यापुढेही सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या मूर्ती प्राणप्रतिष्ठान सोहळ्यासाठी
व मंदिरासाठी गावातील प्रतिष्ठित दानशूर ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले त्यांचे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी कौतुक केले आणि वडापुरी गाव हे एका विचाराचं गाव असल्याचं आवर्जून स्पष्ट केले.
यावेळी ग्रामस्थ  उपस्थित होते.  प्रगतशील शेतकरी भागवत काटकर यांच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला त्याचा लाभ उपस्थित भाविक ग्रामस्थांनी भक्तिमय वातावरणात घेतला. सायंकाळी ५ ते ७ यावेळी गावातील श्रीनाथ भजनी मंडळ यांच्यावतीने हरी भजन करण्यात आले. त्यानंतर ७ ते ९ ह भ प नवनाथ महाराज गोडगे यांचे हरी किर्तन संपन्न झाले. यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
close