shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

'चला संविधान शिकूया ' कार्यक्रम उत्साहात संपन्न


आपला धर्म आपल्या उंबऱ्याच्या आत असावा
- डॉ. बाळासाहेब बळे

 प्रतिनिधी : महेश चव्हाण

पारगाव सुद्रिक : ३ / 'मासूम पुणे ' आणि 'सहारा सर्वांगीण विकास संस्था श्रीगोंदा ' यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि .२ मार्च रोजी सकाळी ११ वाजता पारगाव सुद्रिक येथे 'संविधान गटासोबत चला संविधान शिकूया ' हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

आदिवासी पारधी समाजाचे अभ्यासक डॉ. बाळासाहेब बळे यांनी सार्वभौम , धर्मनिरपेक्षता, लोकशाही ,सामाजिक ,आर्थिक, राजनैतिक आणि स्वातंत्र्य , समता ,बंधुता या मूल्यांचा उदाहरणासह  उपस्थितांना अगदी सोप्या भाषेत संविधान समजून सांगितले. लोकशाही जर वाचवायची असेल तर भारतीय संविधान पोथी , पुराणाप्रमाणे वाचले पाहिजे. धर्मनिरपेक्ष अबाधित ठेवायचे असेल तर  आपला धर्म आपल्या उंबरठ्याच्या आत ठेवावा लागेल असे मत सरांनी व्यक्त केले . संविधानाने शिक्षणाचा अधिकार दिला म्हणून आज आदिवासी पारधी समाजातील यशवंतराव चव्हाण सामाजिक युवा पुरस्कार प्राप्त छाया भोसले आपणास आज विविध ठिकाणी संविधान शिकवत आहे .असे बोलताना  सर म्हणाले. तर धार्मिक मोठमोठे सप्ताह , डीजे लावून कार्यक्रम घेऊन त्यात फक्त पैसा खर्च होतो जीवन जगण्यासाठी जे मिळायला हवं ते यातून काहीच मिळत नाही आणि म्हणून यापुढे राष्ट्रसंत महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथीला विविध क्षेत्रातील विचारवंतांचे प्रत्येक महिन्याला एक व्याख्यान ठेवणार असल्याची माहिती दत्तात्रय हिरवे यांनी दिली. सहारा संस्थेच्या सौ छाया भोसले यांनी प्रास्ताविक केले बाळासाहेब आल्हाट, मंगेश घोडके, यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी सुरेखा हिरवे सरपंच पारगाव सुद्रिक, शहाजी हिरवे, राहुल दानवे, मंगेश घोडके, हिराबाई गोरखे, भाऊसाहेब बोटे आणि सौ छाया भोसले यांनी संविधान संवर्धन फेलोशिप अंतर्गत संविधान गटातील महिला पुरुष उपस्थित होते.  सत्काराचा खर्च टाळून सत्कारासाठी भारतीय संविधानातील उद्देशिका देण्यात आली.कार्यक्रमाच्या शेवटी सामूहिक भारतीय संविधानातील उद्देशिका वाचून कार्यक्रमाचा समारोप केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश घोडके यांनी केले तर आभार दत्तात्रय हिरवे यांनी मानले.
close