इंदापूर प्रतिनिधी: आज खोरोची ता इंदापूर येथील हेगडकर वस्ती येथे गणपती मंदिर सभामंडपाचे भूमिपूजन आमदार दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते पार पडले.
यावेळी आमदार भरणे म्हणले की, खोरोची गाव हे राष्ट्रवादी काँग्रेस च्या पाठीमागे कायमस्वरूपी उभे राहिले आहे.त्यामुळे या गावाला आत्तापर्यंत न मागता निधी दिला आहे त्यामुळे यापुढेही कोणत्याही विकासकामांसाठी निधी दिला जाईल.अशी ग्वाही खोरोची ग्रामस्थांना दिली.
यावेळी गणपती मंदिर सभामंडप बांधकामासाठी पाच लाख रुपये निधी देण्याची घोषणा आमदार भरणे यांनी केली.
या वेळी जिल्हा बँकेचे माजी संचालक मदन देवकाते, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील,तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,सचिन सपकळ,नवनाथ रुपनवर, दादा पाटील,अनिता खरात,शुभम निंबाळकर, दादा भाळे,संपत सरक,संजय चव्हाण,देवकर भाऊसाहेब,दादा हेगडकर,सतिश हेगडकर,बापूसाहेब हेगडकर,सुनील कोकरे,दादा वाघमोडे ,दिलीप वाघमोडे,विशाल देवकर,भीमराव पाटील,पोपट पांढरे,शरद कुंभार,हनुमंत कुल्हाळ,दत्तात्रय फडतरे आदी मान्यवर उपस्थित होते.

