shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नांदूरखी मार्गे जाणाऱ्या शिर्डी विमानतळ मार्गाचे रुंदीकरण होणार मात्र चौपदरीकरण नाही:-नामदार राधाकृष्ण विखे

नागरिकांना दिलासा

नांदूरखी वार्ताहार:- शिर्डीमध्ये आधुनिक पद्धतीने चोवीस तास विमानसेवा तर 500 कोटी रुपयांची नवीन अद्यावत इमारत काकडी विमानतळ येथे होणार असल्याने साई दर्शनाला येणाऱ्या साई भक्तांचा ओघ अधिकच वाढणार असून तर समृद्धी महामार्गामुळेही साईभक्तांची गर्दी शिर्डीत होणार आहे याचा विचार करून शासनाने नांदूरखीतून जाणाऱ्या शिर्डी विमानतळ मार्गाचे चौपदरीकरण करण्याऐवजी रुंदीकरण करण्याची तयारी केलेली आहे त्यामुळे जड वाहतुकीसाठी निमगाव कोरहाळे या बायपास नेच जड वाहतूक होणार असून शिर्डी ते काकडी विमानतळाच्या वाहनतळ मार्गाचे चौपदरीकरण होणार नसल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी नांदूरखी तील एका कार्यक्रमात सांगितले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के हेही होते तर याच वाहनतळ मार्गावर नांदूरखी चौकात अनेक अपघात होऊन निष्पाप लोकांच्या बळी जाण्याच्या घटना वारंवार घडत असून या घटनांना पायबंद घालण्यासाठी सदर विमानतळ मार्गावर गतिरोधक बसविण्याचे आदेश संबधित विभागाला दिले असल्याचे ही त्यांनी सांगितले. तर नांदूरखी येथील 42 एकर जमीन साई संस्थानला काही वर्षांपूर्वीच दान देण्याचा निर्णय उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे लांबणीवर पडला असल्याचे सांगून काही दिवसातच या ठिकाणी अद्यावत क्रीडा संकुल सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले तर शिर्डी मतदार संघातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना साडे आठ कोटी रुपयांचा विमाही सरकारने मंजूर केला असून त्याचे वितरण ही लवकरच होणार आहे नांदूरखी हे गाव दुग्धव्यवसाय फळे व फुले व्यवसायात आघाडीवर असल्याने शिर्डी येथे होणाऱ्या महा पशुसंवर्धन मेळाव्याला उपस्थित राहून 13 राज्यांमधून पशुप्रदर्शनासाठी विविध मार्गदर्शन कार्यक्रमाचाही या भागातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे त्यांनी सांगितले सध्याच सरकार जनसामान्याच सरकार असल्याने चोवीस तास पिण्याचे पाणी देण्यासाठी जलजीवन योजना नांदूरखी गावात प्रभावीपणे राबवून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शंभर टक्के मार्गी लावण्याचे आश्वासन ही त्यांनी यावेळी दिले आपल्यावर नांदूरखीकरांचे बऱ्याच दिवसापासून प्रेमाचे संबध असून नांदूरखी तील जेष्ट झोटिंगबाबा दूध संस्थेचे अध्यक्ष अर्जुनराव चौधरी यांच्या दूध संस्थेच्या कारभारा चीही प्रशंसा करून सुमारे 40 वर्षांपूर्वी फक्त दूध संस्थेच्या चिठीवर सोने मिळण्याची संस्था एकमेव नांदूरखी असल्याचे सांगून चौधरी यांच्या कार्याचा गौरव केला तर त्यांच्या हस्ते गावातील विविध विकास कामाचे उदघाटन व भूमिपूजन संभारभ ही संपन्न झाला या कार्यक्रमाला शिर्डी प्रांताधिकारी गोविंद शिंदे पोलिस उपविभागीय अधिकारी संजय सातव संगमनेर प्रांताधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरोळे राहाता तहसीलदार कुंदन हिरे उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोरहळे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वरपे पंचायत समिती चे किरण कुमार आरगडे संजय गायकवाड देविदास धापटकर डोरहाळे चे माजी सरपंच बाळासाहेब डांगे यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते नांदूरखी चे सरपंच माधवराव चौधरी उपसरपंच विरेश चौधरी सर्व ग्रामपंचायत सदस्य नांदूरखी सोसायटी चे चेअरमन ज्ञानदेव चौधरी भारतीय लहुजी सेनेचे रामभाऊ पिंगळे यांच्यावतीने नामदार विखे व माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला शिवाजी सोपान चौधरी राजेंद्र जयराम चौधरी प्राध्यापक रामनाथ चौधरी अर्जुन रावजी चौधरी भगवान रावजी चौधरी बापूसाहेब चौधरी कचेश्वर चौधरी ध्रुव चौधरी संजय वाकचौरे रामदास चौधरी दादासाहेब चौधरी रावसाहेब चौधरी अविनाश गायकवाड सचिन कोळगे आदीसह ग्रामस्थ हजर होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच माधवराव चौधरी यांनी केले तर आभार रामनाथ चौधरी यांनी मांडले.
close