shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आंतर्राष्ट्रीय महिला दिवस..!

शौकतभाई शेख
श्रीरामपूर - ०८ मार्च २०२३ रोजी कारेगांव  भाऊसाहेब जनसेवा केंद्रातर्फे महिला दिनानिमित्त भव्य महिला सन्मान, प्रबोधन मेळावयाचे आयोजन केल्याची माहिती संयोजिका सौ.अनिता भाऊसाहेब भवार पाटील यांनी दिली. 

 
कारेगांव येथील प्राचार्य भाऊसाहेब भवार पाटील बहुउद्देशीय सांस्कृतिक सभागृहात होणाऱ्या या मेळाव्याचे उदघाट्न श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती डॉ. वंदनाताई ज्ञानेश्वर मुरकुटे यांच्या हस्ते होणार आहे. सरपंच सौ. उषाताई  पटारे, मा.सरपंच सौ. अनुराधा बाळासाहेब पटारे, उपसरपंच सौ. ज्योतीताई  विजयराव पटारे, तलाठी प्रज्ञाताई दयाराम माटे, महिला मंडळ यांच्यासह प्राचार्य शन्करराव अनारसे, प्राचार्य टी. ई. शेळके,प्राचार्य डॉ. शन्करराव गागरे, डॉ. बाबुराव उपाध्ये, पत्रकार प्रकाश कुलथे, प्रा. शिवाजीराव बारगळ,  लेविन भोसले, कवयित्री संगीता फासाटे, पत्रकार राजेंद्र देसाई, कवी, गीतकार बाबासाहेब पवार, कवी आनंदा साळवे,कवी सागर आदी सह मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली. या कार्यक्रमास उपस्थित राहवे असे आवाहन प्राचार्य भाऊसाहेब भवार पाटील, सौ. अनिता भाऊसाहेब भवार पाटील, अमोलराजे भवार पाटील आदिंनी केले.


close