shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे करा - डॉ.वंदनाताई मुरकुटे


शौकतभाई शेख
श्रीरामपूर -  आधीच सुलतानी संकटाने हवालदिल झालेल्या बळीराजावर अवकाळी पावसाचे आस्मानी संकट कोसळल्माने मोठा हतबल होत चिंतातूर झाला आहे.सोमवारी रात्री अवकाळी पावसाने पीकांचे मोठे नुकसाने केले आहे.

कारेगाव ,वांगी येथील शेत शिवारातील नुकसानग्रस्त गहू, मका, कांदा पिकांची पाहणी पंचायत समितीच्या सभापती डॉ.वंदनाताई मुरकुटे यांनी केली. 

यावेळी त्यांच्या समवेत माजी चेअरमन रमेशआण्णा उंडे, भरत जाधव तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते. या आवकाळी पावसाने झालेल्या पीक नुकसानीचे तात्काळ सरसकट पंचनामे करण्याची विनंतीही त्यांनी तहसीलदार व कृषी अधिकारी यांना भ्रमणध्वनी वरून केली आहे.
close