shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ʻʻकरुन होलिकेला नमन केले व्यसनांच्या राक्षसाचे दहन"


शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स, भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा, समाज कल्याण सामाजिक न्याय, समाज कल्याण अहमदनगर जिल्हा व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चा अनोखा उपक्रम

    उत्सव आला की व्यसन आले. आज उत्सव वाचवणे गरजेचे आहे म्हणून अनोखा उपक्रम करुन होलिकेला नमन केले व्यसनांचे दहन या व्यसनांची होळी या कार्यक्रमाचे आयोजन सोमवार, ०६ मार्च २०२३ दुपारी ५.०० ते ०६.०० वाजेपर्यंत कानिफनाथ मंदिर चौक ,पालखी रोड शिर्डी येथे करण्यात आले होते.
    मा.प्रांताधिकारी साहेब उपविभागीय प्रांत कार्यालय,शिर्डी श्री. गोविंद शिंदे यांनी व्यसनमुक्तीसाठी उचलेले हे पाऊल स्वागतार्ह असल्याचे त्यांनी दिलेल्या संदेशात म्हटले होते. 
कारण व्यसनांना अटकाव करायचा असेल तर सुरुवात तंबाखू पासून करावी लागेल. यावेळी दारु, गुटखा, सिगारेट, अमली पदार्थ, गांजा, अफू, गर्द, ड्रग्ज, चरस यांची वेष्टणे, आवरणे या व्यसनांचा चार फुटी भव्य राक्षसाचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले. जेणेकरुन समाजातील व्यसनांचा समूळ नाश होईल व निर्व्यसनी शिर्डी व महाराष्ट्राचे स्वप्न पुर्ण होईल.
शिर्डी पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ व शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी सदरील उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
   कार्यक्रमाची सुरुवात व्यसनमुक्तीचे कलरफुल पोस्टर शिर्डी शहराचे भाजपा नेते व मा नगराध्यक्ष श्री शिवाजी गोंदकर, भाजपा शहर अध्यक्ष श्री सचिन शिंदे, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रभारी अशोक पवार, भाजपा ओबीसी मोर्चा राहता तालुका अध्यक्ष स्वानंद रासने ,भाजपा अल्पसंख्याक सेलचे शब्बीर सय्यद,ओबीसी नेते सुधीर शिंदे , ओबीसी नेते गणेश वाघचौरे यांच्या हस्ते झळकावून उपस्थित जनसमुदायांत प्रबोधन घडवून आणले. आपण करित असलेल्या व्यसनामुळे जखडलेल्या राक्षसाने आपल्या मुसक्या आवळल्याचे चित्रण यावेळी या पोस्टर च्या माध्यमातून दाखविण्यात आले..

व्यसनांच्या या राक्षसाभोवती व्यसनांचे दुष्परिणाम दर्शविणारी पोस्टर्स प्रदर्शनी लोकांचे लक्ष वेधुन घेत होती. व त्यातुन व्यसनांचा आयुष्यावर किती घातक परिणाम होतो व त्यापासुन परावृत्त राहुन आनंदी जिवन जगण्याचा अनमोल सल्ला उपस्थितांना मिळाला. वाचा विचार करा आणि निर्व्यसनी महाराष्ट्र निर्माण करण्याच्या संकल्पात सहभागी व्हा या पत्रकांचे वाटप यावेळी करण्यात आले.
   यावेळी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स चे संस्थापक अध्यक्ष व भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष अॅड.विक्रांत वाघचौरे यांनी मार्गदर्शन करताना व्यसन हा मानसिक, शारिरीक व कौटुंबिक आजार आहे व तो दूर होऊ शकतो.. एखाद्या माणसाला व्यसन कोणते आहे व ते किती आहे यावर त्याचे उपचार अवलंबून असतात. आपणही उपचार करुन बरे होऊ शकता त्यामुळे स्वतः व ईतरांना निर्व्यसनी करण्यासाठी आपण नशाबंदीच्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले व उपस्थित जनसमुदायाला निर्व्यसनी राहण्याचा संकल्प दिला. 
शिर्डी शहरात प्रथमच होणाऱ्या या होळीच्या अनोख्या कार्यक्रमास स्थानिकांचा उस्फुर्त प्रतिसाद होता.
तसेच याच प्रकारच्या होळीच्या कार्यक्रमाचे आयोजन संपुर्ण महाराष्ट्रात करण्यात आले असुन नुसतेच वरील व्यसने नव्हे तर सध्याच्या दैनंदिन जिवनात असणारी सोशल मिडियातील फेसबुक, व्हाँट्सअप, व्टिटर, इंस्टाग्राम यासारख्या व्यसनांना पुढील काळांत गंभीरतेने सामोरे जावे लागणार आहे त्यामुळे अशा व्यसनांचे ही दहन करावे असे आवाहन उपस्थितांना  आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सचे राहता तालुका अध्यक्ष श्री राकेश भोकरे यांनी केले.


 व्यसनांच्या राक्षसाचे प्रतिकात्मक दहन अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष जुबेर शेख , पंडित गुढे, योगेश कावरे, राजू पांचाळ, रोहित सोलंकी,शंकर कुऱ्हाडे, संतोष नागपुरे, दीपक चौधरी, रवी कोलकर,रुपेश पुरी, दादासाहेब काळे,बद्रीनाथ लोखंडे ,कालिदास डंबाळे,मोंटी कोडेले ,अनील ठाकुर, दिगंबर जोशी, ऋषिकेश कुरकुटे , कृष्णा जाधव , यांनी केले यावेळी  शिर्डी ग्रामस्थ व पदाधिकारी व साईभक्त मोठया संख्येने उपस्थित  होते.
व्यसनमुक्त महाराष्ट्र ! सक्षम महाराष्ट्र !
close