shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री साईबाबा संस्थान कर्मचारी वेल्फेअर संघटनेच्या वतीने मानाचा साईबाबा चषक 2023 क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न


शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन) 
श्री साईबाबा संस्थान कर्मचारी वेल्फेअर संघटने च्या वतीने श्री साईबाबा संस्थान मधील कर्मचाऱ्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा मानाचा साईबाबा चषक 2023 क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

सदर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी चे चेअरमन तथा जिल्हाप्रमुख न्यायाधीश माननीय श्री सुधाकर यार्लागड्डा तसेच श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राहुलजी जाधव तसेच प्रशासकीय अधिकारी श्री कैलास खराडे श्री संजय जोरी श्री आकाश किसवे श्री दाभाडे साहेब तसेच संस्थांमधील सर्व विभाग प्रमुख यांच्या उपस्थित संपन्न झाला या स्पर्धेत साई संस्थान मधील 20 विभागातील क्रिकेट संघांनी सहभाग घेतला होता सदर स्पर्धा दिनांक 19 2 2023 ते 21 2 2023 अखेर पर्यंत चालली सदर स्पर्धा ही अत्यंत खेळीमेळी च्या वातावरणात पार पडली या स्पर्धेत प्रथम क्रमांक साई धर्मशाळा पाणीपुरवठा. द्वितीय क्रमांक संरक्षण. विभाग तृतीय क्रमांक साईबाबा हॉस्पिटल .चतुर्थ क्रमांक फायर अँड सेफ्टी विभाग. या संघांनी मिळविला या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज चा मानकरी साई धर्मशाळा संघाचा प्रवीण पठारे हा ठरला स्पर्धेचे बक्षीस वितरण साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राहुल जी जाधव प्रशासकीय अधिकारी श्री कैलास खराडे श्री संजय जोरी मा नगरसेवक ताराचंद कोते यांच्या हस्ते संपन्न झाला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संघटनेचे संस्थापक प्रतापराव कोते, संघटनेचे अध्यक्ष अरुण जाधव, सतीश धनवटे, भगवान गुजर, नवनाथ जाधव, रवींद्र सुरळे, विनोद कांदळकर, भाऊसाहेब औताडे, अतिक पठाण, गणेश जानराव, सुनील पवार, राजेंद्र बोठे,प्रविण वाणी, मोहसीन शेख, योगेश गोरक्ष, मंगेश आसणे, सागर खामकर इतर सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.
close