shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर पतंजली योग समितीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा विविध पुरस्काराने सन्मान.

इंदापूर पतंजली योग समितीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा विविध पुरस्काराने सन्मान.
इंदापूर : आज दिनांक ८ मार्च २०२३ जागतिक महिला दिनानिमित्त महिला पतंजली योग समिती इंदापूर व पतंजली योग परिवार इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शहा सांस्कृतिक भवन या ठिकाणी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला.
 जागतिक महिला दिनानिमित्त योगप्रणामा बरोबर  महिलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतले.  मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आल्या  व समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एकूण ११ महिला भगिनींना समाजभूषण, आदर्श माता, आदर्श कन्या व कोविड योद्धा अशा विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच दि. ५ मार्च २०२३ रोजी गुरुकृपा मंगल कार्यालय येथे आरोग्य शिबीर घेण्यात आले. या आरोग्य शिबिरामध्ये सुमारे ३९ रुग्णांना श्रींगी उपचार करण्यात आले. तसेच ३०० ते ३५० रुग्णांचे नाडी परीक्षण,मधुमेह, बीपी इ तपासणी करण्यात आले.
 या शिबिरासाठी पतंजलीच्या आयुर्वेदाचार्य डॉ. ¹ सिंग, डॉ. संध्या, डॉ. सोनाली, डॉ. संदेश देशमुख, श्रींगी उपचार तज्ञ शेरुजी राजपूत यांचे योगदान लाभले. श्रींगी उपचारामुळे अनेक वर्षापासून चे जुनाट सांधे दुखणे यावर रुग्णांना अतिशय चांगल्या प्रकारचा लाभ झालेला दिसून आला तसेच या कार्यक्रमांमध्ये लहान मुलांनी योगाची प्रत्यक्ष करून दाखवली. साक्षी सतीश चोपडे या मुलीने संगीतावरती अवघड अशी आसने करून दाखवली. तर महिला पतंजली योग समितीच्या अध्यक्षा  मायाताई विंचू यांनी पसायदानावरती योगासने  करून दाखविली. . या कार्यक्रमासाठी पतंजली महिला योग समितीच्या वरिष्ठ राज्य प्रभारी मा. सौ. सुधाताई आळीमोरे, मा. सौ. ज्योती जवाहिरे, महाराष्ट्र राज्य प्रभारी कार्यकारणी सदस्या मा. मृणालिनी कुलकर्णी, जिल्हा प्रभारी पिंपरी चिंचवड पतंजलीच्या मा. सुशीला टोपे, तसेच  इंदापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ अंकिता ताई शहा,पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ अंकिता ताई ठाकरे, मैत्रीण ग्रुप इंदापूरच्या मा.सौ. अनुराधा गारटकर, सौ. शोभाताई भरणे, मा. सौ उमा इंगोले आदी मान्यवर उपस्थित होते.
   कार्यक्रम पाहून पतंजलीच्या राज्य प्रभारी सौ.सुधाताई यांनी महिला पतंजली योग समिती व पतंजली योग परिवार इंदापूरचे या कार्याबद्दल कौतुक केले अविरतपणे १९ वर्षे चालू असलेला मोफत  वर्ग पाहून त्या भारावून गेल्या .असेच प्रत्येक तालुक्यामध्ये परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराज यांचे  योग - प्राणायामाचे कार्य चालावे अशी त्यांनी आशा व्यक्त केली.
   कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पतंजली योग परिवाराचे सर्वेसर्वा श्री. दत्तात्रय अनपट सर व श्री मदन जी चव्हाण सर तसेच महिला पतंजलीच्या अध्यक्षा सौ.मायाताई विंचू यांच्याबरोबरच सर्व पुरुष साधक आणि महिला साधक यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.सुनीता गलांडे यांनी केले तर सर्व उपस्थितांचे आभार महिला पतंजलीच्या अध्यक्षा सौ. मायाताई विंचू यांनी मानले.
close