इंदापूर शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख पदी पळसदेवचे सुरज काळे यांची नियुक्ती.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील सुरज वसंत काळे या शिवसैनिकांची इंदापूर विधानसभा क्षेत्र प्रमुख पदी पुणे जिल्हा प्रमुख सुरेंद्र श्यामसुंदर जेवरे यांनी नियुक्तीपत्र देऊन निवड केली.
यावेळी सुरेंद्र जेवरे जिल्हा प्रमुख पुणे, महारुद्र पाटील तालुका प्रमुख इंदापूर, रामचंद्र जामदार कार्याध्यक्ष शिवसेना इंदापूर , देविदास भोंग शिवसेना नेते , मोबिन मतीसे शिवसेना नेते इत्यादी उपस्थित होते.
प्रशासनातील जाणकार, चळवळीतील कार्यकर्ते, पळसदेव चे सुपुत्र सुरज वसंत काळे यांनी अनेक सामाजिक, शैक्षणिक, चळवळीतील पदावरती काम केले असून ते उत्तम संघटन कौशल्य असणारे नेतृत्व म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. यापूर्वी त्यांनी संघटक (तालुका प्रमुख) शिव सहकार सेना इंदापूर, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख इंदापूर इत्यादी पदावर ती काम केले आहे.
आज दिनांक ८ मार्च २०२३ रोजी हिंदुरुदयसम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार व माजी राज्यमंत्री विजय बापू शिवतारे उपनेते व राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य शिवसेना यांच्या सूचनेनुसार शिवसेना पक्षाच्या शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख पदी नियुक्ती करण्यात येत असल्याचे पत्र पुणे जिल्हा प्रमुख सुरेंद्र देवरे यांच्या सहीने नियुक्तीपत्र बारामती शिवसेना भवन येथे देण्यात आले .सदर नियुक्ती ही हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण यांचा सक्रियपणे प्रचार व प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल अशा आशयाचे नियुक्तीपत्र त्यांना देण्यात आले आहे.

