shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गौराईमळा शाळेत विविध महिलांच्या वेशभुषेतुन महिला दिन उत्साहात साजरा.

गौराईमळा शाळेत विविध महिलांच्या वेशभुषेतुन महिला दिन उत्साहात साजरा.
इंदापूर: शेळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गौराईमळा  येथे जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांच्या फोटोंचे पुजन ग्रामपंचायत सदस्या सौ प्रियांकाताई जाधव यांच्या हस्ते करण्यात आले  तसेच मुलींचा सन्मान करुन महिला दिन साजरा करण्यात आला.
या वेळी राणी लक्ष्मीबाई ,वीर माता जिजाऊ ,क्रांतीवीर सावित्रीबाई फुले , आय पी एस किरण बेदी, रमाईमाता या वीरमाताच्या  वेशभुषा करुन त्यांच्या कर्तृत्वा  विषयी मनोगत व्यक्त केले तसेच मुलींना वहीपेनचे वाटप करुन शेवटी जिलेबी, भातभाजी जेवन देऊन महिला दिन उत्साहात साजरा केला. तसेच संगीत खुर्ची ,लिंबु चमचा,रांगोळी सुंदर हस्ताक्षर स्पर्धा तसेच सामान्यज्ञानावरील प्रश्न घेण्यात आले अतिशय आनंदाने उत्साहाने महिला दिन साजरा करण्यात आला. या वेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक   मुख्याध्यापक प्रताप शिरसट सर यांनी केले .उपक्रमशील शिक्षिका जुबेदा पठाण मॅडम यांनी आभार मानले या वेळी  अंगणवाडी मदतनीस कल्पना जाधव, बनकर ताई, मनिषा जाधव या महिलांसह शाळेतील मुलींचाही यथोचित सन्मान करण्यात आला.*
close