shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिव सहकार सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय सचिव पदी सुरज काळे यांची नियुक्ती.

शिव सहकार सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय सचिव पदी सुरज काळे यांची नियुक्ती.


इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील सुरज वसंत काळे या शिवसैनिकांची शिव सहकार सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय सचिव पदी सहकार सेना शिवसेना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय राज्यमंत्री मा. खासदार आनंदराव अडसूळ यांनी २२ मार्च रोजी पत्र देऊन नियुक्ती केली.
यावेळी   ॲड.अनंत सकुंडे कार्याध्यक्ष,सहकार सेना- शिवसेना महाराष्ट्र राज्य उपस्थित होते.
 इंदापूर विधानसभा क्षेत्र प्रमुख पदी पुणे जिल्हा प्रमुख सुरेंद्र श्यामसुंदर जेवरे यांनी  नुकतेच नियुक्तीपत्र देऊन सुरज काळे निवड केली होती.
सदर नियुक्ती ही प्रशासनातील जाणकार, चळवळीतील कार्यकर्ते, पळसदेव चे सुपुत्र सुरज वसंत काळे यांनी अनेक सामाजिक, शैक्षणिक, चळवळीतील पदावरती काम केले असून ते उत्तम संघटन कौशल्य असणारे नेतृत्व  म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. यापूर्वी त्यांनी संघटक (तालुका प्रमुख) शिव सहकार सेना इंदापूर, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख इंदापूर इत्यादी पदावर ती काम केले आहे.
  दिनांक २२ मार्च २०२३ रोजी हिंदुरुदयसम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या सहमती नुसार  शिवसेना पक्षाच्या शिव सहकार सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय सचिव पदी
  नियुक्ती करण्यात येत असल्याचे पत्र माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या सहीने नियुक्तीपत्र  देण्यात आले .
close