shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुका माळी समाज परिषदेची स्थापना.

इंदापूर तालुका माळी समाज परिषदेची स्थापना.

निमगाव केतकी येथे तालुक्यातील विविध गावातील  समाज बांधवांनी एकत्र येत दाखवली एकजूट.
इंदापूर प्रतिनिधी: दि २६ निमगाव केतकी येथील संत सावतामाळी मंदिरात इंदापूर तालुक्यातील सर्व माळी समाजातील  समाज बांधवांनी एकत्र येत इंदापूर तालुका माळी परिषदेची स्थापना केली. तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रतिनिधी घेवून करून एकमताने कार्यकारिणी निवड करण्यात आली.
                  सहविचार सभेचे प्रास्ताविक ॲड कृष्णाजी यादव यांनी करून इंदापूर तालुका माळी परिषद स्थापनेची अधिकृत घोषणा केली. परिषदेची कार्यपद्धती याविषयी मार्गदर्शन केले. सर्जेराव जाधव गुरूजी यांनी कार्यकारिणी कशी असावी , संघटन समाजातील शेवटच्या व्यक्ती पर्यंत पोहोचवण्यासाठी काम करावे असे मत व्यक्त केले. बळीबा बोराटे यांनी अध्यक्ष हा धाडसी , सर्वसामान्य न्याय मिळवून देण्यासाठी धरपडणारा असावा असे सांगितले. यावेळी पुनम तुळशीदास झगडे हीची राज्य लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेत यशस्वी झाल्याबद्दल देवराज जाधव , दत्तात्रय शेंडे , अंकुश जाधव , निवृत्ती गायकवाड , वसंत मोहोळकर ,माऊली बनकर , राहुल जाधव , बळीबा बोराटे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
        यावेळी तालुक्यातील माळी समाज बांधव शेकडोच्या  संख्येने उपस्थित होते.
close