shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शेजुळ यांना भेटण्याची माणुसकी न दाखवणाऱ्यांना संस्कृतीच्या गप्पा मारण्याचा अधिकार आहे का?..... रमेश आडसकर!!

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी  :- रमेश आडसकर कधीही रडिचा डाव खेळत नाही. अशोक शेजुळ यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी स्वतः फिर्याद दिली आहे. या माजलगाव मतदारसंघात मी  काम करीत आहे. कोणत्याही कार्यक्रत्यावर असा  वाईट प्रसंग आला तर मी त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिल असे रमेश आडसकर यांनी सांगितले. माजलगाव शहरातील बँक कॉलनी भागातील त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत रमेश आडसकर बोलत होते. 






यावेळी बबनराव सोळंके, भाजप तालुकाध्यक्ष अरुण राऊत, ज्ञानेश्वर मेंडके, डॉ. भगवान सरवदे, राजेश साळवे, अभय होके पाटील, माणिक दळवे आदी नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना रमेश आडसकर म्हणाले अशोक शेजुळ यांच्या वर झालेला हल्ला इतका गंभीर होता की मी या आधी एवढा गंभीर हल्ला कधीच पाहिला नाही. शेजुळ यांच्यावरील हल्ल्यात त्यांच्या दोन्ही पाय, दोन्ही हातांना गंभीर इजा झालेली आहे. वृद्ध आई, पत्नी, एक अपंग मुलगी व  दोन लहान मुले आहेत. त्या बाबतीत थोडी ही साहनभुती न दाखवता सोळंके कुटुंबच विषयाचे विषयांतर करून खालच्या दर्जाचे राजकारण करीत आहे. सोळंके कुटुंब हे गुन्हा दाखल मी केला असा कांगावा करून काय साध्य करत आहे. शेजुळ यांनीच त्यांच्या वर झालेल्या भ्याड हल्ल्याची फिर्याद स्वतः नोंदवली आहे. त्याच्याशी माझा काही एक संबंध नाही.                             

मी माजलगाव मतदारसंघात काम करत असून भाजप कार्यक्रतेच काय येथे सर्व सामान्य माणसावर जरी असा प्रसंग ओढावला तरी मी त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिल. असे रमेश आडसकर यांनी सांगितले आहे. तसेच केज मतदारसंघाची संस्कृती त्यांनाही माहीत आहे कारण सोळंके कुटुंब हे अनेक वर्षे केज या ठिकाणी वास्तव्य करत होते. राहिला प्रश्न आमचा तर रमेश आडसकर कधीच रडिचा डाव खेळत नाही.                              

सोळंके शेजुळ वादात सोळंके यांनी मला ओढण्याचे काहीच कारण नाही. असा प्रसंग मतदारसंघातील कोणत्याही कार्यक्रत्यावर आला तर मी त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिल असे रमेश आडसकर यांनी म्हटले आहे.

close