नगर प्रतिनिधी :
आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शिर्डी व साईबाबा महाविद्यालयच्या वतीने रक्तदान शिबिराचे साई ब्लड बँक शिर्डी येथे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांनी रक्तदान केले.
याप्रसंगी पत्रकार तुषार महाजन म्हणाले की, रक्तदान हे आपल्या सामाजिक कर्तव्य आहे रक्तदान हे निस्वार्थी भावनेनं केलं पाहिजे. जसा एक जवान देशाच्या रक्षणासाठी आपलं रक्त सांडतो तसच आपल्या रक्ताही कोणाला तरी जीवदान देऊ शकते. आज आपण कितीही विकसित झालो असलो तरी आपण कोणीही रक्ताचा कारखान्याची निर्मिती करू शकत नाही.
यावेळी रितेश भालेराव, रितेश भोसले, धनंजय जाधव, पत्रकार तुषार महाजन आदींनी विशेष परिश्रम घेतले.

