shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केंद्र सरकारच्या महागाईच्या विरोधात इंदापूर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने इंदापूर प्रशासकीय भवन येथे घोषणा देत केले आंदोलन.

केंद्र सरकारच्या महागाईच्या विरोधात इंदापूर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने इंदापूर प्रशासकीय भवन येथे घोषणा देत केले आंदोलन.

इंदापूर तहसीलदार  यांच्या नावे दिले निवेदन.
इंदापूर: बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सौ.सुप्रियाताई सुळे तसेच  इंदापूर तालुक्याचे  आमदार दत्ता भरणे ,जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर  ,महिला जिल्हाध्यक्ष भारतीताई शेवाळे, इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत  कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुका महिला अध्यक्षा छायाताई पडसळकर , शहर अध्यक्षा उमा इंगोले ,सर्व महिला पदाधिकारी यांनी केंद्र सरकार व राज्य सरकार महागाई विरोधात गॅस दरविढीविरोधात प्रशासकिय भवन इंदापूर येथे  अंदोलन करीत निवेदन देण्यात आले . 
केंद्र सरकार सातत्याने दिवसेंदिवस गॅस सिलेंडर किंमतीत  वाढ करीत  आहे. त्यामुळे सर्व सामान्यांचे आर्थीक बजेट कोलमडत आहे ,त्यामुळे सर्व सामान्यांचे व कष्टकरी वर्गाचे जगणे मुश्किल झाले आहे .सरकार सर्व सामान्य जनतेचा विचार करत नाही , या सरकार  विरोधात महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर वतिने अंदोलन करण्यात आले .यावेळी सुनिता भोसले उपाध्यक्षा ,सुमिता सरतापे ,स्मिता पवार,पुनम पवार सुवर्णा धायगुडे ,सुवर्णा ,उज्वला चौगुले उपस्थित होत्या.
close