shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राष्ट्रीय समाज पक्ष इंदापूर तालुक्याच्या वतीने कांद्याला हमीभाव व कांदा निर्यात होणे बाबत इंदापूर तहसीलदार यांना दिले निवेदन .

राष्ट्रीय समाज पक्ष इंदापूर तालुक्याच्या वतीने कांद्याला हमीभाव व कांदा निर्यात होणे बाबत  इंदापूर  तहसीलदार  यांना दिले निवेदन .
इंदापूर:  दिनांक २ मार्च २०२३ रोजी राष्ट्रीय समाज पक्ष इंदापूर तालुक्याच्या वतीने कांद्याला हमीभाव व कांदा निर्यात होणे बाबत  इंदापूर चे तहसीलदार  यांना निवेदन देण्यात आले.
  यावेळी महाराष्ट्रातील शेतकरी पूर्णपणे अडचणीत आला असून कांद्याला हमीभाव प्रतिक्विंटल २ रुपये चेक करण्यात आला दुर्दैवी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. परंतु राष्ट्रीय समाज पक्ष पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बाजूने त्यांच्या पाठीशी उभा राहून  बळीराजासाठी हमीभाव जाहीर करावा आणि अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आदरणीय जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे. यावेळी रासप तालुका अध्यक्ष तानाजी मारकड, तालुका संघटक तानाजी शिंगाडे, शहराध्यक्ष श्रीनिवास सातपुते, उपाध्यक्ष विधानसभा अविनाश मोहिते, नवनाथ कोळेकर उपस्थित होते.

 महाराष्ट्र राज्यामध्ये कांद्याचे उत्पादन चांगले झाले आहे, त्यामुळे अर्थातच बाजारपेठेत आवक चांगली आहे. परंतु दुर्दैवाने शेतकऱ्यांचा कांदा मातीमोल भावाने विकला जातो आहे.  शेतकऱ्यांना कांदा पिकविण्यासाठी प्रती क्विंटल १५०० रू खर्च येतो परंतु आज बाजारात ३०० ते ५०० रू क्विंटल दराने  विकला जातो आहे यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी होणार आहे, तरी महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना प्रती क्विंटल १००० रूपये अनुदान देण्यात यावे आणि यापुढे कांद्याला प्रती क्विंटल किमान ३००० रूपये हमीभाव देण्यात यावा. अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने करण्यात आले.
close