लोणी काळभोर:- येथील मोठ्या वटवृक्षाला रात्री ९ च्या सुमारास डाग बंगला येथे २०० वर्षाहुनही जुन्या वडाला आग लागल्याचे आढळून आले ग्रीन फाउंडेशनचे सदस्य गणेशजी साळुंखे यांनी बघितल्यावर सर्वाना कळविले.
आग लागल्याचे कळवताच लोणी काळभोर पोलिस स्टेशन, ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य, लोणी काळभोर ग्रामपंचायत, यांस कळविले तसेच हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड कंपनीचे रमेशजी यादव साहेब यांनी तात्काळ अग्निशामक गाडी घटनास्थळी पाठवून दिले काही मिनिटांता आग विझविण्यातयश आले.. २०० हुनही अधिक वर्षाच्या वटवृक्षाला आग लागल्याचे कारण अद्याप समजले नाही.
झाडाने खोडातून पेट घेतल्यामुळे मोठी एक फांदी पडली आहे. जर ही गोष्ट लवकर कळाली नसती तर शेजारील शाळेवर झाड पाडले असते शाळेची हानी झाली असती. पण आग विझवल्यामुळे झाड व शाळेवरील संकट टळाले आहे.
यावेळी लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे उपनिरिक्षक मोरे साहेब, भगत साहेब, पंचायत समिती उपसभापती युगंधर काळभोर, गणेश साळुंबे, ग्रीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप, किरण काळभोर, पत्रकार दिगंबर जोगदंड, पत्रकार राम शिग्री, बालाजी मिसाळ यांनी झाडाला लागल्याली आग विझविण्या साठी प्रयत्न केले.आग लागल्या परिसरात शाळा ,शेती,रोड असुन मोठी दुर्घटना टळली.

