शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन)
श्री मुक्ताई ज्ञानपीठ क्षेत्र पुणतांबा द्वारा श्री सद्गुरु नारायण गिरी महाराज या नावाने दिला जाणारा गुरुकृपा पुरस्कार 2023 श्री श्री 1008 श्री महामंडलेश्वर परमहंस स्वामी काशीकान॑दजी महाराज यांना सन्मानपूर्वक सन्मान चिन्ह व मानपत्र महंत स्वामी रामानंद गिरी महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी आमृताश्रमजी महाराज जोशी बिड यांच्या काल्याच्या कितनाने व हजोरो साधकाच्या उपस्थित दिला.
श्री श्री 1008 महामंडलेश्वर श्री स्वामी काशिकान॑दजी महाराज यांना उज्जैन येथे कालिदास खाटू आश्रम तर्फे हि पदवी देऊन गौरविण्यात आले बाबाजींचे शिक्षण आळंदी येथे जोग महाराज च्या वारकरी शिक्षण संस्था आळंदी येथे चार वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जोग महाराजांच्या शताब्दी कार्यक्रमात बाबाजींचा गौरव करण्यात आला.
नाशिक नगर जिल्ह्यात आल्यानंतर प्रवचने कीर्तन भागवत कथा रामायण कथा व भागवत सांप्रदायाचा प्रसार सुरू करण्यात आला शिर्डीत बाबांनी मारुती मंदिरात प्रथम साई चरित्र पारायण केले ते आज पर्यंत भव्य दिव्य स्वरूपात चालू आहे शताब्दी वर्षात शिर्डी परिसरात 11 ठिकाणी साई चरित्र पारायण व किर्तन महोत्सव चे आयोजन केले बाबाजींनी निमगाव येथे ज्ञानेश्वर मंदिर व साईबाबा वारकरी शिक्षण संस्था निर्माण करून शिर्डी व परिसरातील विद्यार्थ्यांना वारकरी शिक्षण दिले बाबाजींनी शिर्डी पंढरपूर शिर्डी आळंदी शिर्डी त्र्यंबकेश्वर शिर्डी पैठण शिर्डी पुणतांबा या तीर्थस्थानी साईबाबा पालखी सोहळा च्या वतीने पाई वारी सुरू करण्यात आली बाबाजींनी नर्मदा परिक्रमा केले.
बाबाजींनी बारा वर्ष चित्रकूट येथे परमहंस आश्रम धारकुडी येथे तपश्चर्या केली दहिवडी येथे दहावीपर्यंत शिक्षणाची सोय केली भागवत धर्माचा प्रसार प्रचार करत आहे यामुळे बाबाजींना मुक्ताई ज्ञानपीठ पुणतांबा महंत स्वामी रामानंद गिरी महाराज यांच्या हस्ते नारायणगिरी महाराज गुरुकृपा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे यावेळी हजारो संख्येने वारकरी संप्रदायातील बाबाजींचे भक्तगण उपस्थित होते.

