shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी आमदार नमिता मुंदडा कडून भव्य नौकरी महोत्सवाचे आयोजन..!!

                         

प्रकाश मुंडे  / केज तालुका प्रतिनिधी:-                               
केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. नमिता मुंदडा यांनी केज विधानसभा मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी भव्य नौकरी महोत्सवाचे आयोजन केले आहे. या मध्ये जाब कार्ड वाटप देखील होणार आहे. पाचवी ते पदवीधर शिक्षण घेतलेल्या युवकांना या भव्य नौकरी महोत्सवात भाग घेऊन आपले व कुटुंबाचे नौकरी च्या माध्यमातून भविष्य निश्चित करण्याची संधी मिळाली आहे. 


23 मार्च रोजी सकाळी ०9 ते दुपारी 03 वाजेपर्यंत या भव्य नौकरी महोत्सवात सुशिक्षित बेरोजगार तरुणांना भाग घेता येईल. खोलेश्वर महाविद्यालय, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक , परळी रोड, अंबाजोगाई जिल्हा बीड येथे या भव्य नौकरी महोत्सवाचे आयोजन केजच्या आमदार सौ नमिता मुंदडा यांनी करून केज मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. 

या मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगार युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी नौकरी हे एक प्रमुख साधन आहे. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून अनेक तरुण युवकांना नौकरी उपलब्ध होऊन त्यांच्या कुटुंबाचा गाडा व्यवस्थीत चालण्यासाठी मोठी मदत होणार आहे. या स्तुत्य उपक्रमाबद्दल आमदार नमिता मुंदडा यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. 

भाजपचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा काकाजी व अक्षय भैया मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी या भव्य नौकरी महोत्सवाचे आयोजन करून सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरी साठी मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.                                    

या नौकरी महोत्सवात भाग घेण्यासाठी अधिक माहिती पाहिजे असेल तर संतोष मोहिते सर 

7875446180,अनंत अरसुडे 7276189999,डॉ.निशीकांत पाचेगावकर 9422489844, बळिराम चोपणे7219250999 , प्रकाश बोरगावकर 7517664761 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
close