शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
शनिवार दिनांक ११ मार्च २०२३
'अनंत स्पोर्ट्स' यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील खेळाडूंनाही मिळणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा प्रशिक्षण..‼️
🏅गणेश शेजुळ अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव प्रशिक्षक..‼️📍
राहुरी : राहुरी ताुक्यातील उंबरे येथील प्राध्यापक गणेश अशोक शेजुळ यांनी आपल्याच गावात (उंबरे) येथे कै. वस्ताद गंगाधर (गंगा मामा) शेजुळ प्रतिष्ठान संचलित 'अनंत स्पोर्ट्स' ची स्थापना केली असून ते स्वतः उच्च विद्या विभूषित अर्थात एम.ए., एम.पी.एड., एन.आय.एस. असून ऑलिम्पिक दर्जाच्या खेळाडूंना असणारे एन. आय. एस. प्रशिक्षक स्वतः आहेत. असे शिक्षण घेणारे ते अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव एन. आय. एस. कुस्ती प्रशिक्षक आहेत.
इतर राज्यात किंवा शहरात एन. आय. एस. प्रशिक्षण घेण्याकरिता एका महिन्यासाठी जवळ पास रू.१०,०००/- इतकी फी घेतात. एवढी फी ग्रामीण भागातील पालक किंवा खेळाडू देखील भरू शकत नाहीत. म्हणूनच केवळ २०/- रुपये प्रति दिवसासाठी इतकी नाममात्र आणि अत्यल्प फी घेऊन ते खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देत आहेत.
यासाठी त्यांनी ग्रामीण भागात म्हणजेच मौजे उंबरे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली असून ते आपल्या केंद्रात गुणवंत खेळाडू घडवत आहेत. त्यांच्या याच गुणवत्ते मुळे त्यांना हरियाणा येथे झालेल्या ज्युनिअर नॅशनल कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र कुस्ती टीमचे मुख्य कोच म्हणून निवड झाली होती तर नुकत्याच झालेल्या मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत त्यांनी पंच म्हणून देखील काम बघितले आहे.
या प्रकारचे शिक्षण व अशी कामगिरी करणारे प्राध्यापक गणेश शेजुळ हे जिल्ह्यातील एकमेव प्रशिक्षक आहेत म्हणुनच राहुरी तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्याला ही त्यांचा सार्थ अभिमान वाटावा अशी त्यांची ख्याती आहे असे मत क्रिडाप्रेमी सह समस्त गावकरी मंडळी व्यक्त करत आहेत.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

