shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे सभागृहासाठी आमदार नमिता मुंदडा यांच्या कडून पाच कोटींचा निधी मंजूर!!

          
प्रकाश मुंडे  /  बीड जिल्हा प्रतिनिधी:-                      केज येथील नगरपंचायत मध्ये आज बुधवारी पाच कोटी रुपयांच्या विविध विकास कामाचे उदघाटन, बांधकाम मजुरांना किट वाटप, बचत गटांना फिरता निधीचे वाटप आमदार नमिता मुंदडा यांच्या हस्ते झाले. 


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे ज्येष्ठ नेते रमेश आडसकर हे होते. कार्यक्रमास अक्षय भैया मुंदडा, अंकुशराव इंगळे, सुरेश पाटील, जनविकास परिवर्तन आघाडीचे अध्यक्ष हारुण भाई इनामदार, नगराध्यक्षा सीताताई बनसोड, विजयकांत मुंडे, मुख्याधिकारी महेश गायकवाड, डॉ. वासुदेव नेहरकर, भगवान केदार, रत्नमाला मुंडे, रत्नाकर शिंदे, डॉ. ञिंबक चाटे,महादेव अण्णा सुर्यवंशी , राहुल गदळे, अतुल इंगळे, विनोद गुंड, दिपक कांबळे, राजु इनामदार, जलालुद्दीन इनामदार, सुरेश नांदे, संतोष जाधव व महिला , पुरुष मंडळी व पञकार बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.                                         

या कार्यक्रमात बोलताना आमदार नमिता मुंदडा म्हणाल्या की मतदारसंघात होणारी कामे दर्जेदार व्हावीत यासाठी स्वतः लक्ष देत असून केज शहरात सर्वांच्या जिव्हाळ्याचा लोकनेते गोपीनाथ मुंडे सांस्कृतिक सभागृहाच्या उभारणीसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर आणल्याची माहिती देऊन,  लोकनेते गोपीनाथ मुंडे सांस्कृतिक सभागृहासाठी पाच कोटी रुपये शासकीय मान्यतेचा जि. आर. नगराध्यक्षा सीताताई बनसोड व केजचे जेष्ठ नेते अंकुशराव इंगळे यांच्या कडे सुपूर्द केला. 


सदरील निधी मंजूर झाल्यानंतर या कामासाठी पहिल्या पासून प्रयत्नशील असणारे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांचा केज शहरातील शासकीय विश्रामगृह येथे  शहरातील युवकांनी सत्कार करुन आभार मानले.
close