shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

करमाळ्यात डायलिसिस प्रक्रिया यशस्वी ; पाच मशीनद्वारे रोज दहा रुग्णांना मिळणार उपचार


प्रतिनिधी: सुर्यकांत होनप 

करमाळा: दि. २९/ करमाळा तालुक्यातील केम येथील गरजू रुग्णाला तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली डायलिसिस सेवा देण्यात आली. डायलिसीससाठी बार्शी, नगर, पुणे इत्यादी ठिकाणी जावे लागणाऱ्या रुग्णांना ही सेवा करमाळ्यात उपलब्ध झाल्यामुळे संबंधित रुग्णांना आधार निर्माण झाला आहे. ‘स्वातंत्र्य सैनिक मनोहरपंत चिवटे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल’च्या वतीने ही सेवा सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यक पक्षप्रमुख मंगेश चिवटे यांच्या प्रयत्नातून हॉस्पिटलची कार्यकारी संचालक दीपक पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सेंटर सुरू झाले आहे.

तालुक्यातील केम येथील रामेश्वर बिचितकर या रुग्णाला सेंटरमार्फत डॉ. बबन यमकर व श्री बबन मुळे यांच्या देखरेखी खाली पहिल्यांदाच ही सेवा देण्यात आली. डायलिसिस प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर रामेश्वर बिचितकर यांचा सत्कार स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेचे अध्यक्ष नरसिंह चिवटे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वैद्यकीय सहाय्यक नागेश चेंडगे, राजेंद्र मेरगळ, संजय जगताप, मारुती भोसले, निलेश चव्हाण आदीजण उपस्थित होते.
close