shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राजनीति समाचार न्यूज चैनलच्या विभागीय संपादकपदी उस्मानभाई शेख यांची निवड

येवला प्रतिनिधी:
 तालुक्यातील पाटोदा या गावातील रहिवासी माजी उपसरपंच महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष तसेच राजनीति समाचार वृत्तपत्र व न्यूज पोर्टलचे नाशिक जिल्हा प्रतिनिधी उस्मान कादरभाई शेख यांची राजनीति समाचार न्यूज चॅनलच्या विभागीय संपादक पदी निवड करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र लघु वृत्तपत्र पत्रकार संघाचे प्रदेश महासचिव व राजनीति समाचार न्यूज चॅनलचे उपसंपादक फकीर महंमद शेख (एफ एम) यांनी दिली.

पाटोदा येथे महाराष्ट्र लघुत्तपत्र व पत्रकार संघ व राजनीति समाचार कार्यालयात संपन्न झालेल्या नाशिक जिल्ह्यातील पत्रकारांच्या बैठकीत पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष व राजनीति समाचार न्यूज चैनल न्यूज पोर्टल व वृत्तपत्राचे मुख्य संपादक शेख बरकत अली यांनी श्री उस्मान भाई शेख यांची या पदावर नियुक्ती केली असून त्याबाबतचे नियुक्तीपत्र श्री उस्मान भाई शेख यांना आपल्या हस्ते प्रदान केले.

यावेळी शेख बरकत अली यांनी सांगितले की श्री उस्मान भाई शेख हे गेल्या १७  वर्षापासून आपल्याबरोबर प्रामाणिकपणे काम करीत असून त्यांनी सुरुवातीला दैनिक बहिष्कृत भारत या वृत्तपत्राचे येवला प्रतिनिधी म्हणून काम केले, यानंतर राजनीति समाचार या वृत्तपत्राचे नाशिक जिल्हा प्रतिनिधी म्हणून उत्कृष्टपणे काम केले, गेल्या दोन वर्षापासून त्यांनी राजनीति समाचार न्यूज पोर्टल व राजनीति समाचार न्यूज चैनल चे नाशिक जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम पहात आहेत, सलग पाच वर्षापासून महाराष्ट्र लघु वृत्तपत्र पत्रकार संघाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम करून नावलौकिक प्राप्त केले आहे. विशेष म्हणजे या सतरा वर्षाच्या प्रवासात श्री उस्मान भाई शेख यांनी एकदाही चुकीचे काम केले नाही किंवा आपल्या पदाचा गैरवापर केलेला नाही, त्यांच्या या उत्कृष्ट कामाची दखल घेत त्यांना राजनीति समाचार उद्योग समूहात विभागीय संपादक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघ व राजनीति समाचार उद्योग समूहाच्या वतीने शेख बरकत अली, शेख फकीर मोहम्मद, बी. के.सौदागर, अमीरभाई जहागीरदार,असलम बिनसाद, मोहम्मद गोरी, राज मोहम्मद के. शेख, राज मोहम्मद आर. शेख, सुभाषराव गायकवाड, रियाज खान पठाण, इमरान एस. शेख, सुखदेव बाबा केदारे, मन्सूरभाई पठाण, वहाबखान पठाण सूर्यकांत गोसावी, हाजी शकील भाई शेख, प्रकाश शेठ मालोकर, माधवराव सोळशे, कालिदास अनावडे, अबूजर भाई शेख, फईम कलीम सय्यद, राजेंद्र साठे, राजेंद्र सूर्यवंशी, आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
*वृतसंकलन : समता न्यूज नेटवर्क*
close