shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रहारच्या प्रयत्नाने त्या अनाथ मुलीला मिळाले रेशन कार्ड ; रमाई आवास योजनेतून लवकरच देणार पक्के घर - आप्पासाहेब ढूस..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
गुरूवार दिनांक ३० मार्च २०२३

प्रहारच्या प्रयत्नाने त्या अनाथ मुलीला मिळाले रेशन कार्ड ; रमाई आवास योजनेतून लवकरच देणार पक्के घर - आप्पासाहेब ढूस..!!

देवळाली प्रवरा  : देवळाली प्रवरा येथील आरती निलेश पंडित या आई वडील नसलेल्या अनाथ मुलीला प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कोणताही गाजावाजा न करता नुकताच हक्काचा निवारा दिला आहे. आज राहुरीच्या नायब तहसीलदार श्रीमती दंडीले मॅडम यांचे हस्ते त्या मुलीला रेशन कार्ड देवून प्रहार ने आपला शब्द पुर्ण केला. 
      प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांचे मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष अभिजीत दादा पोटे यांच्या सहकार्याने व प्रहार श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघांचे अध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देवळाली प्रवरा येथील अनाथ असलेल्या आरती पंडीत हिला नुकताच हक्काचा निवारा  दिला आहे. आता तिला रेशन कार्ड देवुन प्रहार ने तिच्या राशनचा प्रश्न कायमचा सोडविला आहे. या कामी राहुरीचे तहसीलदार फसियोदिन शेख साहेब, तसेच नायब तहसीलदार दंडीले मॅडम, पुरवठा अधिकारी शिंदे, तलाठी साळवे आदींनी विशेष सहकार्य केले त्याबद्दल आप्पासाहेब ढूस यांनी आभार व्यक्त केले. 

      २८ मार्च रोजी दुपारी राहुरी येथील तहसील कार्यालयात आरतीला नायब तहसीलदार  दंडीले मॅडम यांचे हस्ते नवीन रेशन कार्ड वितरण प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अप्पासाहेब ढूस, प्रहार श्रमिक सेवा संघाचे सचिव बाळासाहेब कराळे, प्रहार चे देवळाली प्रवरा शहर प्रमूख किरण पंडित, प्रहारच्या राहुरी फॅक्टरी महीला शहर प्रमूख रजनीताई कांबळे, प्रहार श्रमिक सेवा संघाचे देवळाली प्रवरा शहर प्रमूख नवनाथ चव्हाण, प्रहार चे आंबी रोड शाखा प्रमूख जमशिल शेख आदी उपस्थित होते. 

      नुकताच आरतीचा निवारा बांधून पूर्ण झाला व जागतीक महिला दिनाचे औचित्य साधून प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने तिला तिचा निवारा ताब्यात दिला  तेंव्हा आरतीला तिचे रेशन कार्ड आणि रमाई आवास योजनेतून कायमचे पक्के घर मिळवुन देणार असल्याचे प्रहार कडून सांगण्यात आले होते.. पैकी आरतीला रेशन कार्ड देवून प्रहार ने आपला शब्द पुर्ण केला असून लवरच आरतीला रमाई आवास योजनेतून घरकुल देण्यात येईल असे याप्रसंगी बोलताना प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर  विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांनी सांगीतले.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close