shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीराम नवमी उत्सवाच्या दरम्यान जिल्हा पोलीस प्रशासनाची जिल्ह्यात टाईट फिल्डिंग.?? ; सोशल मीडियावरही करडी नजर..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
गुरूवार दिनांक ३० मार्च २०२३

श्रीराम नवमी उत्सवाच्या दरम्यान जिल्हा पोलीस प्रशासनाची जिल्ह्यात टाईट फिल्डिंग.?? ; सोशल मीडियावरही करडी नजर..!!

अहमदनगर : श्रीराम नवमी उत्सव महाराष्ट्रभर किंबहुना संपूर्ण देशभर आज मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा होतो आहे. या उत्सवात दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीने अहमदनगर जिल्हा पोलीस दलाने मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात केला आहे. 

    आज सायंकाळी नगर जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये नागरिकांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे मिरवणूका काढल्या जाणार आहे. अलिकडच्या काळात आपण नगर जिल्ह्याचे सामाजिक वातावरण पाहिले तर दोन समाजांमध्ये मोठ्या प्रमाणावर धार्मिक तेढ निर्माण होत असल्याचे प्रकारात वाढ झाली आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दलाकडून विशेष काळजी घेतली जात आहे. खास करून सोशल मीडियावर पोलिसांचा ‘वॉच’ आहे. यासाठी सायबर पोलिसांचे स्वतंत्र पथक काम करत आहे.
 त्यामुळे तरुणांनी सोशल मीडियावर संदेश फॉरवर्ड करत असताना खबरदारी घ्यावयाची आहे. त्याचबरोबर श्रीराम नवमी उत्सवा दरम्यान गैरप्रकार घडू नये यासाठी नगर शहरातून तब्बल 261 गुन्हेगारांना दोन दिवसांसाठी  हद्दपार करण्यात आले आहे.अहमदनगर जिल्ह्यातील शेकडो जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.

 गेल्यावर्षी या उत्सवाच्या दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर या ठिकाणी श्रीराम मिरवणुकी दरम्यान दोन गटांमध्ये मोठा तेड निर्माण झालेला होता. हा उत्सव कुठलाही जातीय तेढ निर्माण न होता शांततेच्या मार्गाने पार पाडण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासन सज्ज झालेल आहे.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close