*रमजान मुबारक*
रविवार दि.२६ - ०३ - २०२३
*रोजा नंबर :- ०३*
लेखक - डॉ.सलीम सिकंदर शेख
बैतुशशिफा हॉस्पिटल, श्रीरामपूर
मोबा: ९२७१६४००१४
*रोजा* :- *भुकेलेले - कुपोषीत - गरीबीची जाणीव करून देणारा पर्व म्हणजेच माहे रमजान*
" हे बांधवांनों,श्रद्धावानांनों तुमच्यावर रोजे अनिवार्य (फर्ज) केले गेलेले आहेत,ज्याप्रमाणे तुमच्या पुर्वीच्या पैगंबरांच्या काळाच्या अनुयायांना ही अनिवार्य होते, अपेक्षा आहे की, याद्वारे तुमच्यामधे अल्लाहा (परमेश्वर) चे भय बाळगण्याचे गुण निर्माण होईल., काही ठराविक दिवसांचे रोजे आहेत,. जर यदाकदाचित तुमच्यापैकी कोणी आजारी असेल अथवा प्रवासात असेल तर,त्याने ईतर दिवसांत त्यांनी ईतकी संख्या पुर्ण करावी.अल्लाहा तुमच्याशी सौम्य व्यवहार करु इच्छितो,कठोरपणे व्यवहार करू इच्छित नाही. म्हणुन तुम्हाला अशी पध्दती दाखवली जात आहे की, त्यामुळे रोजा पुर्ण करावेत आणि ज्या मार्गदर्शनाने (कुरआन) तुम्हाला गौरविण्यात आले आहेत. त्याबद्दल अल्लाहाच्या महिन्यांची अभिव्यक्ती व स्विकार करा व कृतज्ञ राहा. (दिव्य कुरआन - पारा १, सुराहा.२,आ.नं.१८३ ते १८५ )
" सौम्य " या अरबी शब्दावरून " रोजा" - उपवास - हा अर्थ . सकाळी ५ :०० वाजता (भोर ) पहाटेपासून ते सुर्यास्तापर्यंत (संध्याकाळी ६:४८ पर्यंत) अन्नपाणी वर्ज्य करण्याबरोबरच दिवसभर आपल्या वाईट कृत्ये, विचारांपासून विभक्त राहुन अल्लाहा (परमेश्वर) ची उपासना करून, उपाशी पोटी राहणं .
पहाटेच्या ४-० वाजता उठून, उन्हा-तान्हात घामाच्या कष्टाच्या कमाईने आणलेल्या अन्नधान्याला "हलाल" कमाई करणं म्हणतात. अशा कष्टाच्या हलाल कमाईच्या पैशांनी आणलेल्या अन्नधान्य शिजवून सकाळी रोजा साठी जेवतात त्या खाण्याच्या विधीला अरबी शब्दाला '"सेहरी " म्हणतात.
बंधुंनो सेहरी करणं फार गरजेचे आहे, वैद्यकीय दृष्टिकोनातून सकाळी नाश्ता करणं आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.आपल्या दिवसभरातील शरीराला पोषक आहार घेणे आवश्यक असते.
ज्यांना मधुमेह - रक्तदाब - हृदयविकार - थाईराईड - संधीवात इत्यादी आजार आहे त्यांनी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच दैनंदिन रोजची औषधे सकाळी घेऊन व मधुमेह रूग्णांनी आपल्या इन्सुलिन च्या डोसची मात्रा रोजच्याप्रमाणे घेऊन किंवा थोडा कमी प्रमाणात डोस,कारण काही मधुमेह रूग्णांना दिवसातून तीन वेळा इन्सुलिन चे इंजेक्शन डोसेस घेणे गरजेचे असते अशा मधुमेह रूग्णांनी रोजे करु नयेत. जे रुग्ण व्हिल चिअर्सवर आहेत, किंवा जे आजारपणामुळे अशक्त झालेले असेल,महिलांना मासिक पाळी आलेली असेल,किंवा खूप अशक्त झालेले रुग्ण असेल आशा बंधु - भगीनींनी रोजे करु नयेत . किंवा जरी इच्छा असेल तर मात्रा घेऊनच शक्यतो विचार करूनच रोजा चे नियोजन करावे. उत्साहाच्या भरात किंवा कोणाच्याही चुकीच्या सल्ल्यानुसार निर्णय घेऊ नये,तर व्यवस्थितरित्या आपल्या खासगी डॉक्टर व घरातील मंडळींबरोबर योग्य सल्ला घेऊनच शक्यतो निर्णय घेणं आवश्यक आहे.
इस्लाम मधे कोणत्याही गोष्टीसाठी अतिरेकी भुमिका बिलकुल नाहीच. प्रत्येक गोष्टीत पर्याय उपलब्ध आहेत.प्रत्येक ठिकाणी चांगले, योग्य पर्याय उपलब्ध आहेत.कोणत्याही प्रकारचे नुकसान होईल अशी कोणतीही अतिरेकी भुमिका बिलकुल नाही..हे लक्षात घेण्याची गरज आहे.तर आरोग्याच्या दृष्टीने व्यवस्थित राहील असे आहार घेऊनच सेहरी करून रोजा ला सुरूवात केली तर स्वतःबरोबर घरातील इतर सदस्य देखील आनंदाने रोजा चा आनंद घेऊ शकतील असो.
सेहरी करून आपल्या अंतर्मनातील इच्छा शक्तीतुन मनोमन "रोजा" उपवासाची तयारी करणं फारच महत्वाचं असतं.अन्यथा तुम्ही पहाटे सेहरी न करता दिवसभर उपाशीपोटी राहणे यामुळे रोजा चे पुन्य (सबाब) शुन्य टक्केच राहील. कारण रोजा साठी मनातील खुप गोष्टींची नियमावली पाळावी लागतात.
त्यावर,हजरत अबु हुरैरा रजि. सांगतात की,प्रेषित मुहम्मद स्व. यांनी सांगितले की,"जो खोटा आहे, रोजा ठेवून दगाबाजी करतात,आशा रोजदार - (रोजा ठेवणारा उपवासकरु) ची आम्हाला मुळीच गरज नाही, अशांनी फक्त दिवसभर उपाशीच राहीले"(सहीह बुखारी शरीफ हा.नं.१९०३)
फक्त उपाशीपोटी राहणं म्हणजे रोजा ठेवणं नव्हे ,तर अल्लाहा (ईश्वरा) च्या आदेशानुसार आपल्यामधे ज्या वाईट भावना, प्रवृत्ती,सवयी ,आचार-विचार आहेत त्या सर्व गोष्टींना सोडून देणं, मनातील वाईट सवयीं, साठवून ठेवलेले द्वेष आणि मत्सर,कटुता,अश्लिल विचार, अश्लिल चाळे करत आसाल तर ते सोडुन देणे,अश्लिल फोटो, व्हिडिओज,पोस्टर्स,हे बघणे सर्व सोडून देणं, त्याचप्रमाणे कोणत्याही व्यक्तीला - समाजाला त्रास होईल आशा सवयी,विचार सोडून देणं, आपल्याकडून ईतर कोणालाही किंचितही त्रास ,ईजा होणार नाही याची काळजी घेणे. एवढी कसरत करुन मनाची पुर्ण तयारी करून ,दिवसभर सर्व सवयी,व्यसनं सोडून उपासना करुन दिवसभर रोजा ने राहणं म्हणजे त्यांच्या मनाच्या,ईच्छा शक्तिवर,संयमावर किती ताबा मिळवला असेल,तुमच्या संयमाची परीक्षा दिली असं वाटतं.
प्रेषीत मुहम्मद स्व. म्हणतात की," कयामत (प्रलयंकाळ)च्या दिवशी जन्नतुल फिरदौस (स्वर्गात) एक "रययान"नावाच्या प्रवेश द्वारातुन फक्त रोजा करणाऱ्यांनाच प्रवेश दिले जाईल ('सहीह बुखारी हा.नं.१८९६ ).
जगात प्रत्येक शहरात -खेड्यात - गल्लीत कुठे ना कुठे परिस्थिती नुसार, सामाजिक बहिष्काराची , आर्थिक परिस्थिती,दुष्काळी परिस्थिती,भुकंपाची परिस्थिती, महापुराची स्थिती,नुसार असे खुप लोक उपाशी पोटी राहतात.खुप ठिकाणी भुकबळी पडलेले आहेत,काही भुकेले तर आपल्या आजूबाजूला ही असतात परंतु त्यांच्या स्वाभिमानी परिस्थिती नुसार भिक मागु शकत नाहीत, भिकारी रस्त्यावर कधी पासून उपाशी आहे व अन्ना पाण्याविना किती व्याकुळ होत असेल,गरजु , पीडित,अनाथ, निराधार, दुष्काळग्रस्त,संकटग्रस्त कसे उपाशी राहत असतील यांच्या विषयी मनात एकप्रकारची हुरहुर, तळमळ उत्पन्न होवुन त्यांच्यावर काहीतरी आपल्या परीने त्यांना मदत,अशी परोपकाराची भावना याच रमजानच्या रोजामुळे निर्माण होते.
भुक ही जात नाही तर परिस्थिती आहे यामुळे जाती -:पातीच्या भिंती तोडून परोपकार वृत्तीची भावना तयार होते.
अल्लाह ला रोजा तुन हेच अपेक्षित आहे. हेच खरं साध्य व अंतिम सत्य आहे.इस्लाम हा फक्त मी माझा- परीवार कुटूंब पुरता मर्यादित बिलकुल नाही तर ईस्लाम हा दुसऱ्यांना जगण्याची प्रेरणा देतो व बरोबर घेऊन चालतो,जगा आणि जगु द्या हिच इस्लाची शिकवण आहे ( क्रमशः).
(मित्रांनो सदरील लेख आपणास आवडल्यास यात कोणताही बदल वैगरे न करता आपल्या मित्रांना आवश्य पाठवा. खाडाखोड करु नये तथा प्रतिक्रिया अवश्य कळवा).
*आपला मित्र - डॉ. सलीम सिकंदर शेख
बैतुशशिफा हॉस्पिटल श्रीरामपूर

