shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर महाविद्यालयामध्ये उद्या २६ मार्च रोजी ज्ञानवर्धिनी रेडिओ 90.4 एफएम या केंद्राचे उद्घाटन.

इंदापूर महाविद्यालयामध्ये उद्या २६ मार्च रोजी ज्ञानवर्धिनी रेडिओ 90.4 एफएम या केंद्राचे उद्घाटन.
   इंदापूर प्रतिनिधी: भारत सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, इंदापूर या ठिकाणी 'ज्ञानवर्धिनी रेडिओ 90.4 एफएम' या समुदाय आकाशवाणी केंद्रास संचलित करण्यासाठी मान्यता दिली आहे. याचे औचित्य साधून महाविद्यालयाने 'ज्ञानवर्धिनी रेडिओ 90.4 एफएम' या समुदाय आकाशवाणी केंद्राचे उद्घाटन रविवार, दिनांक 26 मार्च 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता आयोजित केले आहे. 
   या कार्यक्रमासाठी राज्याचे माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील अध्यक्षस्थानी असणार असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे चे कुलगुरू प्रा. डॉ. कारभारी विश्वनाथ काळे,  आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादचे अधिष्ठाता प्रा. डॉ. भालचंद्र बाबुराव वायकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. जीवन सरवदे आणि ज्ञानवर्धिनी रेडिओ 90.4 एफएम केंद्राचे समन्वयक डॉ. संदिप शिंदे यांनी दिली.
close