सातारा:- नागठाणे ता.जि.सातारा येथे अंगणवाडी नवीन वास्तू उदघाटन कार्यक्रम वेळी अंगणवाडी ची चिमुकली विद्यार्थिनी शिवाण्या विकास कांबळे ही डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानव जातीला प्रकाशाचे जीवदान दिले असे घोष वाक्य म्हणताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.
समर्थ अंगणवाडी क्र.३५१ ची नवीन वास्तू ची सामाजिक कार्यकर्ते व जेष्ठ नागरिक कुंडलिक साळुंखे यांनी फित कापून उदघाटन केले. शिव साळुंखे, राजवी शिर्के, श्रावणी सुतार, प्रांजल कदम या चिमुकल्याणी स्वागत गीत म्हणून प्रमुख पाहुण्यांना मंत्रमुग्ध केले.
एकात्मिक बालविकास सभायोजना प्रकल्प प्रवेशिका सौ.कविता खाडे, सरपंच सौ. रूपाली बेंद्रे, उपसरपंच अनिल साळुंखे, ग्रामपंचायत सदस्यांनी भाषनात अंगणवाडीत बालकांचे संस्कार पाहून सेविका सौ.भारती दिनेश वेळापूरेना शिल्पकार उपमा देऊन प्रामाणिक कामाचे शाबासकी दिली.
नागठाणे च्या अंगणवाडी सेविकांनी प्रबोधनकार व एकपात्री कलाकार मोहन इंदापूरे , अंगणवाडीस आर्थिक व वस्तू स्वरूपात मदत करणार्या पालक व जेष्ठ नागरिकांना फुल-श्रीफळ देऊन सत्कार केले. सदर कार्यक्रमास पालक सौ तुलशी नलवडे, पत्रकार प्रकाश कांबळे यांनी आपल्या मुलांनवर सेविका भारती वेळापूरे मॅडम यानी केलेल्या संकाराचे पाडाच वाचला. सुत्रसंचालन सौ.भारती दिनेश वेळापूरे तर आभार अंगणवाडी सेविका सौ. प्रमिला पवार यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मदतनीस सौ.सुनीता कोकाटे, दिनेश वेळापूरे, ओंकार वेळापूरे व ग्रामस्थांनी कष्ट घेतले. या कार्यक्रमास आजी - माजी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

