shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुढील उच्च शिक्षणासाठी जर्मनीला जात असलेबाबत परिवर्तन फाउंडेशन व त्रिदल सैनिक सेवा संघाच्यावतीने तांबे यांचा सत्कार...!

शौकतभाई शेख
श्रीरामपूर - येथील सर्वसामान्य कुटुंबातील ऍड.संजय तांबे यांचे चिरंजीव राम तांबे हे आपल्या पुढील उच्च शिक्षणासाठी जर्मनीला जात असलेबाबत परिवर्तन फाऊंडेशन आणि त्रिदल सैनिक सेवा संघाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

मनात काही करण्याची जिद्द, चिकाटी आणि काही तरी वेगळे करुन दाखविण्याची धमक असल्यास मनुष्य कठिण परिस्थितीवर देखील यशस्वीरित्या मात करु शकतो याची प्रचिती राम तांबे यांच्या रुपाने श्रीरामपूर करांना बघावयास आणि अनुभवयास मिळाली आहे.
येथील सामान्य कुटुंबातील ऍड‌. संजय तांबे यांचे चिरंजीव राम तांबे यांचे इयत्ता १२ वी पर्यंतचे शिक्षण श्रीरामपूर येथील रावबहादूर नारायणराव बोरावके विद्यालयात झाले असून त्यानंतरचे शिक्षण बी टेक मेकॅनिक गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कराड या ठिकाणी झाले व त्याच ठिकाणाहून कॅम्पस इंटरव्यू मध्ये सिलेक्शन होऊन जे एस डब्ल्यू जिंदाल स्टील पनवेल अलिबाग या ठिकाणी परमानंट प्लांट असिस्टंट मॅनेजर म्हणून दोन वर्ष आपली उत्कृष्ट सेवा बजावली असून आता जर्मनी येथे एम एस सप्लाय चेन मॅनेजमेंट या दोन वर्षाच्या कोर्ससाठी एस आर एच युनिव्हर्सिटी हम एन आर डब्ल्यू स्टेट जर्मनी या साता समुद्रापार दिनांक ३० रोजी मुंबई एअरपोर्ट या ठिकाणाहून दोन वर्षाच्या कोर्ससाठी रवाना होत असल्याने येथील परिवर्तन फाउंडेशन श्रीरामपूर व त्रिदल सैनिक सेवा संघाच्यावतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना मेजर कृष्णा सरदार म्हणाले की, आपण आपल्या देशाचे, राज्याचे आई- वडिलांचे नांव उज्वल होईल असे  उच्च शिक्षण घेऊन उंच भरारी घ्यावी, संघटनेचे सदस्य गोरख आढाव यांनी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना ऍड. संजय तांबे म्हणाले की आपल्या संघटनेने माझ्या मुलाच्या पाठीवर एक शाबासकीची थाप दिली आहे, निश्चितच तो आपल्या देशाचे, राज्याचे,तालुक्याच आणि आई-वडिलांचे नाव लौकिक करेल अशी मला शाश्वती आहे. कार्यक्रमास परिवर्तन फाऊडेशनचे अध्यक्ष माजी नायब तहसीलदार उत्तमराव दाभाडे, त्रिदल सैनिक सेवा संघाचे नगर उत्तर विभागाचे उपाध्यक्ष मेजर कृष्णा सरदार, गोरख आढाव आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय शिरसाठ सर यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ, वैशाली तांबे मॅडम यांनी केले.

close