shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडार समाजाचे कैवारी लोकप्रिय आमदार अभिमन्युजी पवार यांचा लामजना येथे वडार समाजाचे वतीने भव्य सत्कार..!

लातूर:-
कै. मारुती चव्हाण वडारआर्थिक विकास महामंडळ मिळवून दिल्याबद्दल औसा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय अभिमन्यूजी पवार  यांचा लामजना येथे वडार समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला...!

      वडार समाजाला ७५ वर्षानंतर खर्या अर्थाने न्याय मिळवून देणारे एकमेव आमदार म्हणजे औसा विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिमन्युजी पवार होत. वडार समाजाचा लातूर येथे ३ जून २०१८ ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महामेळावा घेतल्यानंतर एकाच महिन्यामध्ये वडार समाजाचे हिताचे ११अधिसूचना तातडीने काढण्यात आले होते..परंतू त्यानंतर फडणवीस सरकार पडले..त्यामुळे सदर शासननिर्णय प्रलंबित आहेत. परंतू लातूरच्या मेळाव्यामध्ये वडार समाजासाठी एक विशेष आर्थिक विकास महामंडळ निर्माण करण्यात यावे आणि त्या महामंडळास ३०० कोटीचा निधी उपलब्द करुन देण्यात द्यावे, अशी मागणी होती.त्याप्रमाणे आमदार पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर तातडीने पाठपुरावा करुन वडार समाजाला पैलवान कै.मारूती वडार(चव्हाण) यांच्या नावाने महामेळाव्यातील मागणीप्रमाणे कै.मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करुन बजेटमध्ये ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.यासाठी आमदार पवार व सामाजिक कार्यकर्ते नितीनजी वाघमारे यांचा मोलाचा वाटा आहे. यामुळे आमदार पवार यांना वडार समाजाचे कैवारी म्हणून संबोधले जात आहे.तसेच आमदार पवार यांचा महाराष्ट्रभर वडार समाजाचे वतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
close