नगर प्रतिनिधी : (संजय महाजन)
उत्कृष्ट बातमी
बंद झालेल्या गुदद्वारवर राहाता येथील डॉ. गोरे हॉस्पिटलमध्ये लेसरद्वारे यशस्वी उपचार करून रुग्णाला वेदनेपासून दिलासा दिला आहे. कोल्हार येथील ४० वर्षीय रुग्णाने २ महिन्यांपूर्वी शौचास जाण्यास मोठा त्रास होत होता. मोठ्या प्रमाणात वेदना होत असल्यामुळे त्या रुग्णाने एका वैद्याकडे जाऊन वेदना होत असलेल्या ठिकाणी धागा बांधून ऑपरेशन केले. परंतु या उपचारानंतर रुग्णास ठिक वाटण्याऐवजी जास्त त्रास होऊन रक्त पडणे, शौचास गेल्यानंतर प्रचंड वेदना होणे असा त्रास पुन्हा सुरू झाला. अनेक ठिकाणी उपचार घेऊनही सदर रुग्णाच्या वेदना कमी होत नसल्यामुळे त्यांच्या मित्रांनी राहाता येथील डॉ. गोरे यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याचा सल्ला दिला. या रुग्णाची डॉ. किरण गोरे यांनी तपासणी केली असता शौचाच्या जागेवरील भाग गरजेपेक्षा जास्त कापल्यामुळे, जागा बारीक झाली असल्याचे निदर्शनास आले.
त्यास वैद्यकीय भाषेमध्ये नल स्ट्रक्चर असे म्हणतात. या रुग्णावर डॉ. गोरे यांनी लेझरद्वारे यशस्वी उपचार केल्यामुळे वेदनेपासून दिलासा मिळाला आहे. असे उपचार पूर्वी पुणे-मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये होत असे. परंतु आता राहाता शहरात डॉ. किरण गोरे यांच्या अचूक उपचार पद्धतीमुळे राज्यातील हजारो रुग्ण मुळव्याध, फिशर, व्हेरिकोवेन्स, विविध पोटाचे विकार यावर उपचार घेण्यासाठी येतात. मूळव्याध आजाराचा त्रास होणाऱ्या रुग्णांनी योग्य डॉक्टरांचा सल्ला घेऊनच योग्य उपचार केल्यास हमखास बरेच होतील, असे डॉ. किरण गोरे यांनी सांगितले.

